मुंबई: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूमध्ये एका बदल करण्यात आला आहे. तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणार आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. शार्दुल ठाकूर ऐवजी संघात उमेश यादवचा समावेश करण्यात येऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या उमेश यादवला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. त्याची फिटनेस टेस्ट झाल्यानंतर निवड समिती याबाबत निर्णय घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी सोडण्यात आले आहे. भारतीय संघाच्या १७ सदस्यांमध्ये केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे. राहुल देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव करताा जखमी झाला होता. या शिवाय नेट गोलंदाज म्हणून असलेले अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज नदीम आणि प्रियंक पंचाल यांना विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीझ करण्यात आले आहे. निवड समितीने पाच नवे नेट गोलंदाज निवडले आहेत. यात अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार यांचा समावेश आहे. तर राखीव खेळाडू म्हणून केएस भारत आणि राहुल चाहर यांना निवडले आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता मालिकेतील तिसरी कसोटी जगातील सर्वात मोठ्या मोटेरा मैदानावर होणार आहे. ही कसोटी डे-नाइट होणार आहे. त्यानंतर चौथी कसोटी देखील त्याच मैदानावर होईल. वाचा- आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेत इंग्लंडचा २-१ किंवा ३-१ने पराभव केल्यास टीम इंडियाला फायनलचे तिकीट मिळू शकेत तर इंग्लंडला ही मालिका ३-१ जिंकावी लागणार आहे. वाचा- असा आहे भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aqEJuF
No comments:
Post a Comment