चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी उद्या (१८ फेब्रुवारी रोजी) चेन्नईत लिलाव ( ) होणार आहे. या लिलावासाठी आठ संघ एकूण २९२ खेळाडूवर बोली लावतील. यापैकी १६४ खेळाडू भारतीय असतील. तर ३५ ऑस्ट्रेलियाचे, २० न्यूझीलंडचे, १९ वेस्ट इंडिजचे, १७ इंग्लंडचे, १४ दक्षिण आफ्रिकेचे, ९ श्रीलंकेचे, ७ अफगाणिस्तानचे आणि नेपाळ, युएई आणि युएसए या देशाचे प्रत्येकी १ खेळाडू आहेत. वाचा- चेन्नईत होणाऱ्या या मिनी लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत हे देखील जाणून घेऊयात. या वर्षी लिलावासाठी सर्वाधिक पैसे पंजाब किंग्जकडे आहेत. पंजाबकडे ५३.२० कोटी इतकी रक्कम आहे. त्यानंतर आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडे ३७.८५ कोटी इतकी रक्कम आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे ३५.४० कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. वाचा- आठ संघ आणि त्यांच्याकडे असलेली रक्कम पंजाब किंग्ज- ५३.२० कोटी राजस्थान रॉयल्स- ३७.८५ कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- ३५.४० कोटी चेन्नई सुपर किंग्ज- १९.९० कोटी मुंबई इंडियन्स- १५.३५ कोटी दिल्ली कॅपिटल्स- १.४० कोटी कोलकाता नाइट रायडर्स- १०.७५ कोटी सनरायजर्स हैदराबाद- १०.७५ कोटी लिलावात सर्वात कमी रक्कम कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडे आहे. मोठी नावे आणि मोठे ड्रॉ या वर्षीच्या लिलावात काही मोठी नावे देखील आहेत. मिनी लिलाव असला तरी काही खेळाडूंना संघांनी रिलीझ केल्याने ते लिलावासाठी उपलब्ध झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ , हरभजन सिंग, शाकिब अल हसन, मोइन अली, केदार जाधव यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची किमत २ कोटी इतकी आहे. त्याच बरोबर गेल्या हंगामात अपयशी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल, सॅम बिलिंग्स, मार्क वुड, लियाम प्लंकेट, जेसन रॉय हे देखील दोन कोटीच्या बेस प्राइसमधील खेळाडू आहेत. वाचा- >> आयपीएलचे सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने १८ खेळाडूंना रिटेन केले तर सात खेळाडूंना रिलीझ केले. ते १५.३५ कोटी रुपयात सात खेळाडू विकत घेऊ शकतील. त्यात ३ भारतीय तर ४ विदेशी खेळाडूंना ते विकत घेऊ शकतील. >> चेन्नईने १८ खेळाडूंना रिटने केले तर ६ जणांना रिलीझ केले. ते ६ खेळाडूंना विकत घेऊ शकतील ज्यात ५ भारतीय आणि एक १ परदेशी खेळाडू असतील. >> कोलकाता संघने १७ खेळाडू रिटने केले तर ६ जणांना रिलीझ केले. हा संघ ८ खेळाडूंना विकत घेऊ शकेल ज्यात ६ भारतीय आणि २ परदेशी असतील. >> पंजाब संघाने १६ खेळाडूंना रिटने केले तर ९ जणांना रिलीझ केले. ते ९ जणांना विकत घेऊ शकतील. ज्यात ४ भारतीय आणि ५ परदेशी असतील. >> राजस्थान रॉयल्सने १६ जणांना रिटेन तर ८ जणांना रिलीझ केले. या लिलावात ते ९ खेळाडूंना विकत घेऊ शकतील. ज्यात ६ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडू असतील. >> सनरायजर्स हैदराबादने २२ खेळाडूंना रिटेन तर ५ जणांना रिलीझ केले. लिलावात ते ३ खेळाडू विकत घेऊ शकतील. ज्यात २ भारतीय आणि १ परदेशी खेळाडू असेल. >> रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १२ खेळाडू रिटेन केले तर १० जणांना रिलीझ केले. आता ते लिलावात ११ जणांना विकत घेऊ शकतील. ज्यात ८ भारतीय ३ परदेशी खेळाडू असतील. >> दिल्ली कॅपिटल्सने १७ जणांना रिटने केले तर ६ जणांना रिलीझ केले. लिलावात ते ८ खेळाडू विकत घेऊ शकतील.ज्यात ५ भारतीय आणि ३ परदेशी असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LWlFuX
No comments:
Post a Comment