जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ()ने आज (१७ फेब्रुवारी) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. डुप्लेसिसने आगामी दोन टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी आणि त्याच्या तयारीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. वाचा- फाफ डुप्लेसिसने या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध अखेरची कसोटी खेळली. ३६ वर्षीय या खेळाडूने २०१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड येथे कसोटीत पदार्पण केले होते. त्याने दुसऱ्या डावात ३७५ चेंडूत नाबाद ११० धावा केल्या होत्या. या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार होता. पण करोना व्हायरसची परिस्थिती बिकट झाल्याने ऑस्ट्रेलियाने हा दौरा स्थगित केला. अशातच डुप्लेसिसने निवृत्तीचा निर्णय देखील जाहीर केला. मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटीतून निवृत्त होणार होतो. मला जसा शेवट अपेक्षित होता तसा हा नसला तरी ही योग्य वेळ असल्याचे मनाने सांगितले, असे डुप्लेसिसने म्हटले. त्याला २०१६ साली आफ्रिकेच्या कसोटी संघाचे कर्णधार करण्यात आले होते. डुप्लेसिसने एबी डिव्हिलियर्सकडून संघाचे नेतृत्व घेतले होते. वाचा- डुप्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव कर्णधार आहे ज्याने २०१६ साली ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर पराभूत केले. तर २०१८ साली देखील घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याने नेतृत्व केलेल्या २७ कसोटीपैकी १७ मध्ये विजय मिळवला होता. वाचा- कर्णधार आणि फलंदाज म्हणून डुप्लेसिसचे रेकॉर्ड गेल्या दोन वर्षापासून काही खास नाही. यामुळेच त्याने राजीनाम्याची घोषणा केली. कसोटीत त्याने ६९ सामन्यातील ११८ डावात ४०हून अधिकच्या सरासरीने ४ हजार १६३ धावा केल्या. ज्यात १० शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत १९९ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZocwhY
No comments:
Post a Comment