Ads

Tuesday, February 16, 2021

इंग्लंडविरुद्धच्या वनडे, टी-२० मालिकेतून बुमराहला वगळण्याची शक्यता, हे आहे कारण

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा जलद गोलंदाज ()ला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० आणि तीन सामन्यांच्या वनडे (India vs England ODI-T20 Series) मालिकेसाठी संघातून वगळण्यात येऊ शकते. चेन्नईत कालच संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील बुमराहला विश्रांती दिली होती. वाचा- इंग्लंडविरुद्ध उर्वरीत दोन कसोटी सामन्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका अहमदाबाद येथे होणार आहे तर त्यानंतर पुण्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. हे आठही सामने मार्च महिन्यात होतील. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या धोरणानुसार जसप्रीत बुमराहला विश्रांतींसाठी संघातून वगळले जाऊ शकते. पुढील दोन कसोटीत विजय मिळून भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून आतापर्यंत १८० ओव्हर टाकल्या आहेत. चार कसोटीत त्याने १५० ओव्हर गोलंदाजी केली. त्याच बरोबर तितका वेळ तो मैदानावर होता. यामुळेच मर्यादित षटकांच्या या मालिकेत त्याला विश्रांती देण्याची गरज आहे. वाचा- आर अश्विनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. सध्या कसोटीत देखील त्याने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. आता तो भारतीय संघात स्थान मिळवतो का हे पाहावे लागले. याआधी राहुल द्रविडने २०११ साली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत संघात अशाच प्रकारे स्थान मिळवले होते. तेव्हा द्रविडने तीन वर्षानंतर वनडे संघात स्थान मिळवले होते. द्रविडने कसोटीत चांगली कामगिरी केली म्हणून त्याला वनडेत घेण्यात आले होते. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा देखील विचार केला जाऊ शकतो. निवड समिती वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने खेळाडू निवडू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37DuxNZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...