चेन्नई, : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. पण भारतीय संघाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण इंग्लंडच्या खेळाडूंनी यावेळी भारतीय संघाला विजयाचे श्रेय दिलेले नाही. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकल्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये भारतीय संघाने इंग्लंडच्या दुय्यम संघाला हरवले, असे म्हटले होते. पीटरसन यावेळी म्हणाला की, " भारतीय संघाचे इंग्लंडच्या 'ब' संघाला पराभूत केल्याबद्दल अभिनंदन..." इंग्लंडने आपल्या महत्वाच्या खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली होती. त्यामळे भारताला इंग्लंडवर विजय मिळवता आला, असे पीटरसनला म्हणायचे आहे. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक ट्विट केले आहे. यामध्ये वॉनने म्हटले आहे की, " आता भारताविरुद्ध इंग्लंडची सर्वात मजबूत टीम उतरवण्याची वेळ आली आहे. मला वाटलं होतं की, अॅशेस मालिका जिंकणे, ही इंग्लंडची प्राथमिकता असेल. पण प्रत्येक आठवड्यात इंग्लंडचा संघ बदलला जात आहे. गेल्या १८ महिन्यामध्ये फक्त एक कसोटी सामना खेळणाऱ्या मोईल अलीला घरी पाठवण्यात आले आहे." गेल्या १८ महिन्यांमध्ये पहिल्यांदा अष्टपैलू मोईन अलीला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. अलीने या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक आठ विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर पहिल्या डावात अलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला शून्यावर क्लीन बोल्ड केले होते. त्याचबरोबर या डावात अलीने अजिंक्य रहाणेला बाद केले होते. दुसऱ्या डावात कोहलीने अर्धशतक झळकावले असले तरी यावेळीही अलीनेच त्याला बाद केले होते. त्याचबरोबर या डावातही अलीनेच अजिंक्यलाही बाद केले होते. या सामन्यात अलीने फक्त १० चेंडूंमध्ये पाच षटकार मारण्याची किमयाही साधली होती. दुसऱ्या डावात अलीने तुफानी फलंदाजी केली होती. अलीने यावेळी फक्त १८ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. इंग्लंडकडून दुसरा कसोटी सामना हा अलीने गाजवला होता. त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नव्हती. पण तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघा इंग्लंडने अलीला स्थान दिलेले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3apPPjQ
No comments:
Post a Comment