नवी दिल्ली: चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ३१७ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार मात्र अडचणीत आला आहे. चेन्नई कसोटीत त्याने मैदानावरील अंपायर नितिन मेनन यांच्यासोबत वाद घातला. वाचा- कोहलीच्या या वाद घालण्यावरून इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू यांनी कोहलीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशी घटना जर अन्य कोणत्या खेळात झाली असती तर रेड कार्ड दाखवले असते. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी झालेल्या प्रकरणावरून विराटवर एक मॅचची बंदी येण्याची शक्यता आहे. वाचा- इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड म्हणाले, अशी घटना जर अन्य कोणत्या खेळात झाली असतील तर विराटला मैदानाबाहेर पाठवले असते. विराटने केलेला प्रकार म्हणजे रेड कार्ड दाखवले पाहिजे. चेन्नई कसोटीत अंपायरशी वाद घातल्यानंतर विराटवर अद्याप शिस्तभंग कारवाई देखील झाली नाही. वाचा- लॉयड यांच्यामते विराट कोहलीला अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटीत खेळण्याची परवानगी देऊ नये. विराटने अंपायर सोबत घातलेल्या वादावर फक्त लॉयडच नाही तर माजी कर्णधार मायकल वॉन याने देखील टीका केली होती. विराट एक मोठा खेळाडू आहे. पण तो अशा प्रकारे मैदानावर अंपायरला भिती दाखवू शकत नाही. वाचा- अक्षर पटेलच्या चेंडूवर जो रूटला नितिन मेनन यांनी नाबाद दिले. यावर भारतीय संघाने डीआरएस घेतला. चेंडू विकेटवर लागत होता. पण मैदानावरील अंपायरचा निर्णय नाबाद असल्याने रुटला जीवनदान मिळाले. त्यामुळे विराट कोहलीला राग आला. तिसऱ्या अंपायरचा निर्णय आल्यानंतर विराटने मैदानावरील अंपायर मेनन यांच्याशी वाद घातला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jW2Nc9
No comments:
Post a Comment