चेन्नई, : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण ही घोषणा करताना बीसीसीआयने एका महत्वाच्या खेळाडूसाठी अट ठेवली आहे. या खेळाडूने जर फिटनेस टेस्ट पास केली तरच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येणार आहे. पण या टेस्टमध्ये जर तो नापास झाला तर त्याला संघात प्रवेश देण्यात येणार नाही. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला यावेळी संघाने विजय हजारे स्पर्धेसाठी रिलीज केला आहे. शार्दुलच्या जागी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे. पण उमेशला संघात स्थान मिळवण्यासाठी आता फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचे आहे. फिटनेस टेस्ट पास झाल्यावरच उमेशला अहमदाबाद येथे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाठवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर हा सामना दिवस-रात्र असेल. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात कोणताच मोठा बदल केल्याचे पाहायला मिळत नाही. कारण पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी असलेला संघ जवळपास कायम ठेवण्यात आला आहे. या गोष्टीला अपवाद फक्त उमेश यादवचा आहे. त्यामुळे विजयानंतर भारतीय संघात कोणताच मोठा बदल झालेला नाही. सध्याच्या घडीला मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी तिसरा सामना निर्णायक ठरू शकतो. कारण हा सामना जो संघ जिंकेल तो मालिका गमावू शकत नाही. त्यानंतर मालिका बरोबरीत सोडवली जाऊ शकते, पण तो संघ मालिका नक्कीच गमावू शकणार नाही. असा आहे भारतीय संघविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bfS4oW
No comments:
Post a Comment