चेन्नई, : भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण भारताचे दोन महत्वाचे खेळाडू आता फिट झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात या दोन्ही खेळाडूंचा संघात समावेश होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना गंभीर दुखापत झाली होती. पण हे दोघे आता दुखापतीमधून पूर्णपणे सावरले आहेत, त्याचबरोबर ते पूर्ण फिटही झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळू शकते. शमीच्या हाताला ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करत असताना हातावर चेंडू आदळला होता, त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. पण आता तो या दुखापतीमधून सावरला आहे. सैनीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ग्रोइन इंजरी झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळता आले नव्हते, पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. दुखापत झाल्यानंतर या दोघांनाही बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यावेळी या दोघांच्याही दुखापतींचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर या दोघांच्या फिटनेसवर भर देण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनी काही काळ अकादमीमध्ये सरावही केला होता. त्यानंतर हे दोघेही आता फिट झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या संघ निवडीसाठी शमी आणि सैनी हे उपलब्ध असतील. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाती महत्वाच्या खेळाडूंनी गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियातील काही सामने खेळता आले नव्हते. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्यांना खेळता आले नव्हते. पण आता भारताचे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमधून पूर्णपणे सावरले आहेत आणि ते पूर्णपणे फिट असल्यामुळे ते तिसऱ्या सामन्यात खेळू शकतात. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यामुळे त्यांचे मनोबल आता कमालीचे वाढलेले असेल. कारण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता पुढचा सामना नेमका कोणता संघ जिंकतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. पण या सामन्यासाठी शमी आणि सैनी यांना संधी मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37lhr7F
No comments:
Post a Comment