चेन्नई: भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर विजय मिळवन मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना आता २४ फेब्रुवारी रोजी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. वाचा- चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर () दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीचे अपडेट सोशल मीडियावरून दिले. तिसऱ्या दिवशी गिलला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅन झाल्यानंतर बीसीसीआयने तो चौथ्या दिवशी फिल्डिंग करणार नाही, अशी अपडेट दिली होती. वाचा- गिलला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. खबरदारी म्हणून स्कॅनसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीचे आकलन करत आहे, असे बीसीसीआयने म्हटले. वाचा- वाचा- शुभमनच्या जागी मयांक अग्रवालने फिल्डिंग केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या दुखापतीमुळे मयांकने फिल्डिंग केली होती. भारत आमि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी २४ तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे शुभमन गिलला दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ मिळणार आहे. त्याची दुखापत गंभीर असेल तर भारतीय संघाला दुसरा सलामीवीर घ्यावा लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jUrCFx
No comments:
Post a Comment