चेन्नई, : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा हा कसोटी विजय भारतीय संघाबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी महत्वाचा आहे. या विजयानंतर भारतीय संघाने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने विजय मिळवल्यावर खेळाडूंनी एकच जल्लोष केला. पण त्याचवेळी भारतीय संघातील खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंनाही चांगली वागणूक दिली आणि हा कसा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे दाखवून दिले. विराट कोहलीने पहिल्यांचा मोईन अलीशी हस्तांदोलन केले. त्यानंतर विराट कोहली हा रोहित शर्माला भेटला. कोहलीने यावेळी रोहितला शुभेच्छा दिल्या. कोहलीने त्यानंतर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलचे अभिनंदन केले. अक्षरचा हा पहिलाच सामना होता, पण त्याने यावेळी भेदक गोलंदाजी केली आणि या संधीचे सोने केले. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अक्षरचे संघातील स्थान जवळपास निश्चित समजले जात आहे. कारण पुढच्या सामन्यात दोन फिरकीपटूंना संधी मिळू शकते, त्यामध्ये अश्विन आणि अक्षर हे दोघे असण्याची दाट शक्यता आहे. सामनावीर ठरलेल्या आर. अश्विनने यावेळी मोईन अलीबरोबर हस्तांदोलन केले. दोघेही ऑफ स्पिनर असून दोघांनीही या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे हा सामना रंगतदार झाला होता. मोइन अलीने पहिल्या डावात विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले होते आणि या चेंडूचे कौतुक जगभरात झाले होते. सर्व खेळाडू मैदानाबाहेर जात असताना भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मोईन अली यांच्यामध्ये चांगला संवाद झाला. कारण कुलदीप आणि मोईन यावेळी हसताना पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यानंतरही दोन्ही संघांमध्ये चांगले वातावरण असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या कसोटी सामन्यावर असेल. तिसरा कसोटी सामना हा अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामन दिवस-रात्र असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b726Ja
No comments:
Post a Comment