चेन्नई, : चेन्नई कसोटीचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो आर. अश्विन. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, अश्विनने या सामन्यात धमालच केली. पण त्याचबरोबर हा सामना सुरु असताना अश्विनने एका गाण्यावर मैदानात डान्स केल्याचेही पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना घडली. चाहत्यांनी यावेळी अश्विनचा हा व्हिडीओ काढला आहे. अश्विन त्यावेळी सीमारेषेपासून थोडा लांब होता, पण तो अश्विनच आहे ते त्याच्या जर्सीच्या क्रमांकावरुन स्पष्ट समजत होतं. भारतीय संघ हा सामना जिंकणार, हे सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी जवळपास स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे आज चेन्नईमध्ये खेळाडूंबरोबरच चाहत्यांचा मुड चांगला होता. त्याचबरोबर अश्विननेही सामन्यात यावेळी रंगत आणली. भारताचे क्षेत्ररक्षण सुरु असताना मैदानात काही गाणी सुरु होती, त्याचा आनंद चाहते यावेळी घेत होते. अश्विनचे तर हे घरचे मैदान होते. त्यामुळे चाहते त्याच्यावर भन्नाट खूष होते. यावेळी गाणं सुरु असताना थोड्या वेळासाठी का होईना, अश्विनने हात हलवत डान्स केल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी अश्विनच्या या डान्सला भन्नाट प्रतिसाद दिला. त्यामुळेच हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विन हा सामनावीर ठरला. सामना संपल्यावर अश्विन म्हणाला की, " मी लहान असताना जवळपास ८-९ वर्षांचा असल्यापासून माझे वडिल मला याच मैदानात कसोटी सामने पाहायला घेऊन यायचे. त्यावेळी याच मैदानात खेळायचे स्वप्न होते. मी आतापर्यंत चार कसोटी सामने या मैदानात खेळलो आहे. पण या सामन्यात खेळताना मला भरपूर आनंद झाला. याच प्रेक्षकांनी मला हिरो बनवलं. करोनानंतर प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने येतील, असे मला वाटले नव्हते. पण प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे हा सामा माझ्यासाठीच खरंच खास आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ar2wL8
No comments:
Post a Comment