नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि भारताकडून खेळणारा क्रिकेटपटू जयंत यादव आज विवाहाच्या बंधनात अडकला आहे. प्रेयसी दिशा चावलाबरोबर जयंतने लग्न केले असून त्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानेही यावेळी जयंतला शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत आणि दिशा यांनी २०१९ साली साखरपुडा केला होता. जयंत हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जयंत हा २०१८ साली मुंबई इंडियन्सच्या संघात आला होता. यापूर्वी जयंत २०१४ साली दिल्ली कॅपिटल्स या संघात होता. मुंबई इंडियन्सने यावेळी म्हटले आहे की, " आयुष्यातील या नव्या भागीदारीसाठी जयंत आणि दिशा यांना शुभेच्छा..." भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने यावेळी जयंतच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोखाली चहलने शुभेच्छाही दिल्या आहेत. यावेळी चहल म्हणाला की, " जयंत आणि दिशा यांचे अभिनंदन..." जयंत हा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याचबरोबर २०१७ साली जयंत आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण मुंबई इंडियन्ससाठी मात्र तो एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत हा हरयाणाच्या संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळला होता. त्यावेळी सहा सामन्यांमध्ये जयंतने सात विकेट्स मिळवले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3apIQY3
No comments:
Post a Comment