चेन्नई, : पराभवानंतर नेमकं काय करावं, हे इंग्लंडच्या संघाला सध्याच्या घडीला समजत नाही आहे. कारण इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वाधिक आठ विकेट्स आणि पाच षटकार ठोकणाऱ्या खेळाडूलाच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाबाहेर काढले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल आता चाहते विचारायला लागले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर अष्टपैलू मोईन अलीला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. अलीने या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक आठ विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर पहिल्या डावात अलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला शून्यावर क्लीन बोल्ड केले होते. त्याचबरोबर या डावात अलीने अजिंक्य रहाणेला बाद केले होते. दुसऱ्या डावात कोहलीने अर्धशतक झळकावले असले तरी यावेळीही अलीनेच त्याला बाद केले होते. त्याचबरोबर या डावातही अलीनेच अजिंक्यलाही बाद केले होते. या सामन्यात अलीने फक्त १० चेंडूंमध्ये पाच षटकार मारण्याची किमयाही साधली होती. दुसऱ्या डावात अलीने तुफानी फलंदाजी केली होती. अलीने यावेळी फक्त १८ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. इंग्लंडकडून दुसरा कसोटी सामना हा अलीने गाजवला होता. त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नव्हती. पण तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघा इंग्लंडने अलीला स्थान दिलेले नाही. अलीबाबत रुटने काही वक्तव्य केले आहे. पण यावेळी रुटने अलीला वगळण्याचे योग्य कारण मात्र सांगितलेले नाही. रुट यावेळी म्हणाला की, " अलीला मायदेशी जायचे होते, त्यामुळे आम्ही त्याचा विचार तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी केला नाही." पण रुटने यावेळी अलीला का मायदेशी परतायचे होते, याबाबत कोणतेही कारण दिलेले नाही. जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत असतो आणि ज्याची संघाला गरज असते त्या खेळाडूला कोणताही संघ सहजासहजी संघाबाहेर ठेवत नाही. पण अलीच्या बाबतीत मात्र ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाला अलीची उणीव जाणवेल, हे मात्र नक्की.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3arZ3w1
No comments:
Post a Comment