Ads

Wednesday, February 17, 2021

ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत रोहित, अश्विनला झाला फायदा, पंतने पटकावले सर्वोत्तम स्थान

चेन्नई, IND vs ENG : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. पण या सामन्यानंतर सामनावीर आर. अश्विन, रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांना चांगलाच फायदा झाला आहे. पण कर्णधार विराट कोहलीच सर्व भारतीयांमध्ये अव्वल असल्याचे पाहायला मिळाले आहे. आयसीसीने आज आपली कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत सर्वात जास्त फायदा हा रोहित शर्माला झाला आहे. कारण चेन्नईतील पहिला कसोटी सामन्यानंतर रोहित २४व्या स्थानावर घसरला होता. पण दुसऱ्या सामन्यात रोहितने दीडशतक झळकावले आणि याचा फायदा रोहितला झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितने यावेळी तब्बल ९ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे रोहित आता १४व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीनंतर रोहितची पाच स्थानांनी घसरण झाली होती. अश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच कमाल केली होती. अश्विनने शतकासह आठ विकेट्सही मिळवल्या होत्या. याचा फायदा अश्विनला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत झाला आहे. कारण या सामन्यापूर्वी अश्विन सहाव्या स्थानावर होता. पण अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आता तो अव्वल पाच खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. अश्विनने आता या क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. शतक झळकावल्यावर अश्विन फलंदाजांच्या क्रमवारीत ९५वरुन थेट ८१व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीमध्ये अश्विन सातव्या स्थानावर कायम आहे, पण त्याच्या गुणांमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. पंतने यावेळी फलंदाजांच्या क्रमवारीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे पंत आता १३व्या स्थानावरुन ११व्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत पंतला एकदाही ११व्या स्थानावर पोहोचता आले नव्हते. त्यामुळे पंतचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम स्थान आहे. कोहलीने या क्रमवारीत आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा आठव्या स्थानावर आहे, तर अजिंक्य रहाणे १२व्या स्थानावर आहे. आता तिसऱ्या कसोटी भारताचा कोणता खेळाडू दमदार फलंदाजी करतो आणि या क्रमवारीत चांगले स्थआन पटकावतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u4K7f1

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...