नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डीव्हिलियर्सचा आज म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. क्रिकेट विश्वात एबी नावाने ओळखला जाणारा हा क्रिकेटपटू आज ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. मैदानावरील त्याचा वेग, उत्साह आणि वादळी खेळीमुळे आफ्रिकेचा सुपरमॅन देखील म्हटले जाते. वाचा- आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रिकेट खेळण्याआधी एबीने ज्युनिअर स्तरावर गोल्फ, टेनिस आणि रग्बी हे खेळ खेळले होते. पण त्याची सर्वात जास्त गरज क्रिकेटला होती. त्यामुळे आज देखील एबीने केलेले विक्रम कायम आहेत. वयाच्या २१व्या वर्षी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचे फ्यूचर म्हटले जाऊ लागले. एबीने त्याच्या करिअरमध्ये कसोटीत दोन वेळा द्विशतक झळकावले आहेत. यातील एक पाकिस्तानविरुद्ध नोव्हेंबर २०१० मध्ये नाबाद २७८ धावा तर त्याआधी २००८ साली अहमदाबाद येथे भारताविरुद्ध नाबाद २१७ धावा केल्या होत्या. पाक विरुद्धची त्याची खेळी ही आफ्रिकेकडून झालेली सर्वोच्च धावसंख्या आहे. वाचा- वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतक करण्याचा विक्रम एबीच्या नावावर आहे. त्याने फक्त ३१ चेंडूत शतक पूर्ण केले. त्या सामन्यात एबीने १४९ धावा केल्या. वनडेतील सर्वात वेगवान अर्धशतक देखील त्याच्याच नावावर आहे. एबीने फक्त १६ चेंडूत अर्धशतक केले आहे. इतक नव्हे तर आयसीसीचे वनडे प्लेअर ऑफ द इअर हा पुरस्कार त्याने तीन वेळा मिळवला. एबीने आतापर्यंत ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० मध्ये देशाचे प्रतिधित्व केले आहे. कसोटीत २२ शतक आणि ४६ अर्धशतकासह ८ हजार ७६५ धावा. तर वनडेत २५ शतक आणि ५३ अर्धशतकासह ९ हजार ५७७ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याने १० अर्धशतकासह १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना ९ विकेट मिळवल्या आहेत. वाचा- २०१८ साली क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर एबीने पुन्हा एकदा आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण जर आफ्रिकेच्या बोर्डाने ठरवले तर हे होऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3anvKuq
No comments:
Post a Comment