मुंबई : सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, युवराज सिंगहीत बऱ्याच आजी-माजी क्रिकेटपटूंनी याबाबत ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. पण यामध्ये कुठेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आलेले पाहायला मिळत नाही. धोनीने याबाबत आपले मत व्यक्त केले नसेल तरी त्याचीच चर्चा सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलीच होत आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर धोनीचा ट्रेंड जोरात आहे. धोनीने शेतकरी आंदोलनाबाबत एकही ट्विट केलेले नाही किंवा अन्य कुठेही आपले मत व्यक्त केलेले नाही. पण तरीही धोनी सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे. काही जणांच्या मते धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर शेती करायला सुरुवात केली आहे. धोनी सध्याच्या घडीला सेंद्रीय शेती करत आहे. त्यामुळे धोनी या वादात पडलेला नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. शेतकरी आंदोलनाबाबत विराट कोहली म्हणाला...सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग नेमकं काय म्हणाला, पाहा...भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेने ट्विट करत काय सांगितले, पाहा...जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pZRYry
No comments:
Post a Comment