
मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. या ट्विटनंतर काही जणांनी सचिनवर टीका करायला सुरुवात केली. त्याचबरोबर ही टीका करताना काही जणांनी पातळी सोडून सचिनचा अपमान केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र नेटकरी चांगलेच खवळले आहे. सचिनसारख्या महान क्रिकेटटपटूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल आता बरीचं लोकं सोशल मीडियावर विचारत आहेत. जर परदेशातील व्यक्ती भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलू शकतात, तर तो अधिकार , अनिल कुंबळेसारख्या क्रिकेटपटूंनाही आहे. सचिन आणि कुंबळेसारख्या खेळाडूंनी आपली पर्वा न करता ते देशासाठी जीव ओतून खेळले आहेत. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे, पण यासारख्या महान खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. सचिन तेंडुलकरने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानंतर काही जणांनी सचिनवर जोरदार टीका केली होती. पण सचिनवर टीका करत असताना त्याने दिलेले देशासाठी दिलेले योगदान मात्र टीकाकार विसरले. त्याचबरोर काही जणांनी तर सचिनसारख्या महान क्रिकेटपटूचा यावेळी अपमानही केला. त्यामुळे सचिनसारख्या महान खेळाडूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YGZATQ
No comments:
Post a Comment