
नवी दिल्ली: बारबाडोसची प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ( pop star rihanna) हिने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रिहानाच्या या पाठिंब्यावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष दिल्यावरून भारताच्या माजी क्रिकेटपटूने देखील रिहानाला सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा- दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. वाचा- रिहानाच्या या पोस्टवर भारताचा माजी फिरकीपटू ( )ने उत्तर दिले आहे. आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही. वाचा- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे. दिल्लीच्या बाहेरच्या भागात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना इंटरनेट सेवा बंद केल्याबद्दल रिहानाने टीका केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pIWoTD
No comments:
Post a Comment