सिडनी, : तिसरा सामना संपल्यावर भारतीय संघावर संक्रात ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताच्या पाच खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारताचे हे पाच खेळाडू खेळताना दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने जडेजा चौथा कसोटी सामना खेळणार नाही, असे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर अजून चार खेळाडूंनाही गंभीर दुखापत झाली असून ते चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. या पाच खेळाडूंमध्ये जडेजासह हनुमा विहारी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, आर. अश्विन आणि मयांक अगरवाल यांचा समावेश असल्याचे आता पुढे आले आहे. बुमराच्या ओटीपोटीमध्ये दुखत आहे. आता चौथा कसोटी सामना फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. या तीन दिवसांमध्ये बुमराची दुखापत बरी होऊ शकत नाही आणि त्याला चौथ्या कसोटी सामन्याल मुकावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आर. अश्विनच्या पाठीमध्ये उसण भरल्याचेही समजत आहे. तिसरा सामना खेळत असताना अश्विनला पाठीमध्ये दुखापत झाली होती, ही दुखापतही गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. तिसरा सामना वाचवणारा भारताचा फलंदाज हनुमा विहारीलाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे, त्याचे पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. तिसरा कसोटी सामना वाचवण्यात भारताच्या हनुमा विहारीने मोलाची भूमिका बजावली. दुखापतग्रस्त असूनही तो तीन तास खेळत राहीला. पण आता हनुमाची दुखापत बळावली असल्याचे म्हटले जात आहे. हनुमाची दुखापत गंभीर असून तो आता महिनाभर तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात हनुमा खेळणार नसल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. पण याबाबतचा अधिकृत खुलासा अजूनही बीसीसीआयने केलेला नाही. हनुमाच्या जागी संघात मयांक अगरवालला स्थान मिळू शकत होते. पण सराव करत असताना मयांकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला आता हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे समजत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघावर संक्रात आल्याचे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qcDeFH
No comments:
Post a Comment