Ads

Sunday, January 31, 2021

Syed Mushtaq Ali Trophy Final : दिनेश कार्तिकच्या तामिळनाडूची जेतेपदला गवसणी, बडोद्यावर मिळवला विजय

अहमदाबाद : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूच्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तामिळनाडूने भेदक गोलंदाजी करत बडोद्याच्या संघाला १२० धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूने तीन विकेट्स गमावत हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आणि जेतेपद पटकावले. तामिळनाडूने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार दिनेश कार्तिकचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण तामिळनाडूने यावेळी बडोद्याच्या संघाला २० षटकांत १२० धावाच करु दिल्या. खासकरून तामिळनाडूचा फिरकीपटू मनिमरम सिद्धार्थने यावेळी भेदक गोलंदाजी केली. सिद्धार्थने यावेळी आपल्या चार षटकांत २० धआवा देत चार विकेट्स मिळवले आणि बडोद्याच्या संघाचे कंबरडे मोडले. बडोद्याच्या डावाची सुरुवात यावेळी चंगली झाली नाही. कारण दुसऱ्याच षटकात बाबा अपराजितने निनाद राथवाला बाद करत बडोद्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर बडोद्याचा कर्णधार केदार देवधरही बाद झाला आणि त्यानंतर बडोद्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सिद्धार्थने यावेळी केदारला बाद करत आपला पहिला बळी मिळवला. बडोद्याची १ बाद २२ वरुन यावेळी ६ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी बडोद्याचा संघ हा शंभर धावांचा टप्पा तरी ओलांडणार का, असा प्रश्न काही जणांनी पडला होता. पण त्यानंतर बडोद्याचा विष्णू सोळंकी हा संघासाठी धावून आला. सोळंकीला यावेळी अतित सेठची चांगली साथ मिळाली. सोळंकी आणि सेठ यांनी यावेळी सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच बडोद्याच्या संघाला १२० धावांपर्यंत मजल मारता आली. सोनू यादवने यावेळी ही जोडी फोडली. सोनूने अतित सेठला बाद केले आणि ही स्थिरस्थावर झालेली जोडी फुटली. अतितने यावेळी ३० चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. सोळंकीचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. अखेरच्या षटकात मोठा फटका मारताना सोळंकी बाद झाला. सोळंकीने यावेळी ५५ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aiG99A

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये कोण जिंकणार कसोटी मालिका, महान क्रिकेटपटूची भविष्यवाणी

नवी दिल्ली, : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये कोणता देश जिंकू शकतो, याची भविष्यवाणी क्रिकेट विश्वातील एका महान खेळाडूंनी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वीही त्यांनी काही विधानं केली होती आणि ती खरी ठरली होती. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीला अनोखे वजन प्राप्त झाले आहे. क्रिकेटविश्वातील माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यावेळी म्हणाले की, " भारतीय संघाच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारखे अनुभवी फलंदाज भारतीय संघात आहेत. त्याचबरोब रिषभ पंतसारखा धडाकेबाज फलंदाजही भारताकडे आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू संघात आल्यानंतर त्यांची ताकद अजून वाढलेली आहे." चॅपेल यांनी पुढे सांगितले की, " इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच मातीत २-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांचे मानसीक बळ कमालीचे वाढलेले असेल, पण भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहिले तर इंग्लंडपेक्षा भारताचे पारडे जड दिसत आहे. विराट कोहली भारतीय संघात आल्यामुळे त्यांची ताकद नक्कीच वाढलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कठीण परिस्थितीनंतही भारताने हार मानली नव्हती. भारताने पहिल्या पराभवानंतरही मालिका जिंकली होती. त्यामुळे या मालिकेसाठी भारताचा संघच माझ्यासाठी फेव्हरेट असेल." चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच अजिंक्य रहाणेचे कौतुक केले होते. अजिंक्य हा एक आक्रमक कर्णधार आहे, पण त्याच्या देहबोलीतून ते दिसत नाही. त्यामुळे अजिंक्य भारतीय संघ चांगल्यापद्धतीने हाताळेल, असे चॅपेल यांनी सांगितले होते. चॅपेल यांची ही गोष्ट कसोटी मालिकेत पाहायला मिळाली. कारण अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता भारतीय संघ आपल्याच मैदानात इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. पण यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंककडे नसून ते विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या मालिकेत अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36sQcYk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाबाबत केले ट्विट; बीसीसीआय आणि अजिंक्य रहाणेने काय म्हटले, पाहा...

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. पण मोदी यांच्या ट्विटनंतर बीसीसीआयने नेमके काय म्हटले आहे, पाहा... मोदी यांनी आज भारतीय संघाचे कौतुक करताना एक ट्विट केले आहे. यामध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, " या महिन्यात भारतीय पीचवरुन एक अतिशय आनंदाची बातमी मिळाली. आपल्या भारतीय संघाने सुरुवातीच्या काही अडचणींनंतर शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आपल्या भारतीय संघातील खेळाडूंची अथक मेहनत आणि टीमवर्क हे नक्कीच प्रेरित करणारे आहे." मोदी यांनी ट्विट केल्यानंतर बीसीसीआयनेही त्यांना ट्विट करत आपली भावना सांगितली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी जे काही आपल्या संघाला शक्य आहे ते नक्कीच केले जाईल. तुम्ही ज्या शब्दांत भारतीय संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा उत्साह नक्कीच वाढेल. धन्यवाद मोदी जी..." ऑस्ट्रेलियामध्ये भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही यावेळी मोदी यांच्या ट्विटनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजिंक्यने आपल्या ट्विटमध्ये यावेळी म्हटले आहे की, " नरेंद्र मोदीजी, तुमच्या या कौतुकामुळे नक्कीच आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. भारताचे प्रतिनिधीतव करणे, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. यापुढे आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करु आणि भारतवासियांना प्रेरित करण्याचे काम करु." भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ०-१ अशा पिछाडीवरुन २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा अविस्मरणीय विजय मिळवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे यावेळी कौतुक केले आहे. भारतीय संघाचा हा विजय प्रेरणादायी होता, असे मोदी यांनी म्हटेल आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39wmmEq

IPL 2021 : महाराष्ट्राच्या चाहत्यांना खूष खबर, पाहा आयपीएलचे सामने कुठे होणार

मुंबई : यावर्षीच्या आयपीएलसाठी महाराष्ट्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण यावर्षी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे आता समोर येत आहे. हे सामने नेमके कुठे होणार आहेत, याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. करोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय यावेळी बीसीसीआयने घेतल्याचे समजते आहे. महाराष्ट्रामध्ये फार कमी अंतरामध्ये बरेच स्टेडियम्स आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आयपीएल एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांना आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा आनंद यावेळी लुटता येऊ शकतो. यावेळी आयपीएलचे साखळी फेरीतील सर्व सामने महाराष्ट्रामध्येच होणार असल्याचे आता दिसत आहे. यासाठी वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय.पाटील स्टेडियम, नवीन मुंबई येथील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील स्टेडियममध्ये आयपीएल सर्वाधिक सामने होणार असल्याचे आता समजते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चाहत्यांना यावर्षी बीसीसीआयकडून आयपीएलचे गिफ्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. आयपीएल सर्व साखळी सामने यावेळी महाराष्ट्रामध्ये खेळवण्यात येणार आहेत. पण आयपीएलचे बाद फेरीतील सामने यावेळी अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भरवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांमध्ये आयपीएलचे सामने हे अहमदाबाद येथे होऊ शकतात. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामनाही येथेच खेळवला जाऊ शकतो. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात यावर्षी आयपीएल सुरु होऊ शकते. यावर्षी आयपीएलची सुरुवात ११ किंवा १४ एप्रिलला होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामना हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. साधारणत: ६ जूनला आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकतो, असे आता समजत आहे. त्यामुळे यावर्षी भारतामध्येच चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येऊ शकतो. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MnvClg

IPL 2021 : यावर्षी आयपीएल नेमके कधी होणार, समोर आली ही महत्वाची माहिती...

मुंबई : यावर्षी आयपीएल भारतामध्येच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आयपीएल नेमके कधी खेळवायचे, याचा निर्णयदेखील झाला असल्याचे समजते आहे. यावर्षी आयपीएल हे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते. यावर्षी आयपीएलची सुरुवात ११ किंवा १४ एप्रिलला होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामना हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. साधारणत: ६ जूनला आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकतो, असे आता समजत आहे. त्यामुळे यावर्षी भारतामध्येच चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येऊ शकतो. बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून आपल्या क्रिकेट मोसमाची सुरुवात केली आहे. त्यानंतर बीसीसीआय अजून दोन महत्वाच्या स्पर्धा खेळवणार आहे. त्यानंतर सर्व परिस्थितीचा अंदाच आल्यानंतर आयपीएलचे आयोजन केले जाईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे आता काही महिन्यांतच आयपीएलचा जलवा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलच्या कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील, हे स्पष्ट होऊ शकेल. यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावात बरेच नामांकित खेळाडू उपलब्ध होणार आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्ससारख्या संघांनी बऱ्याच नामांकित खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर लिलावात किती बोली लागते आणि ते कोणत्या संघात जातात, याचे चित्र १८ फेबुवारीला स्पष्ट होऊ शकते. सध्याच्या घडीला आयपीएल सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय, केदार जाधव, मोनू सिंग या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे. ग्लेन मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये बरेच नामांकित खेळाडू पाहायला मिळतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pGiIO0

Sourav Ganguly Health Update : सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला हा महत्वाचा सल्ला...

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण गांगुली यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी डॉक्टरांनी यावेळी त्यांना एक महत्वाचा सल्लाही दिला आहे. गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी डॉक्टरांनी यावेळी काही गोष्टींचा सल्ला त्यांना दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी गांगुली यांना काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर प्रकृतीसंबंधी काही गोष्टींचे कडक पालन करण्यासही सांगितले आहे, ज्यामध्ये आहाराचा मुख्यत्वेकरून समावेश आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये गांगुली यांनी काम करु नये किंवा कामाचे दडपण घेऊ नये, असेही त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे. शनिवारी गांगुली यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. गांगुली यांची काही दिवसांपूर्वी अँजिओग्राम आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या उपस्थित गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यावेळी गांगुलीचे कौटुंबिक डॉक्टर आफताभ खानही उपस्थित होते. गांगुली यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी ही यशस्वीपणे झाली होती अँजिओप्लास्टीनंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर होती आणि त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे होते. यापूर्वी गांगुली यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या तीन धमण्यांमध्ये रक्त प्रवाह योग्यपद्धतीने होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी गांगुली यांच्या एका धमनीमध्ये स्टेंट लावण्यात आला होता आणि त्यावेळी अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. बाकीच्या दोन धमन्यांमध्ये काही कालावधीनंतर स्टेंट बसवण्याचा निर्णय त्यावेळी डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर सात जानेवारीला गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रीयेमध्ये गांगुली यांच्या दोन धमन्यांमध्ये यावेळी स्टेंट बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गांगुली यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतरच गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r273ZO

Saturday, January 30, 2021

क्रिकेट मैदानावर झाला असता मोठा राडा; पाहा व्हिडिओ

कराची: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने शानदार कामगिरी करत आफ्रिकेचा सात विकेटनी पराभव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाककडून फवाद आलमने केलेल्या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना ४ फेब्रुवारीपासून रावळपिंडी येथे होणार आहे. वाचा- दोन्ही संघातील पहिल्या कसोटी सामन्यात एक घडना घडली ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावात () आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ( ) यांच्यात वाद झाला. या दोघातील वाद मिटवण्यासाठी मैदानातील अंपायरला यावे लागले. वाचा- पाकिस्तानच्या पहिल्या डावात १०५ षटक केशव महाराज टाकत होता. हसनच्या षटकातील एक चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न अलीने केला. पण चेंडू विकेटला लागला. ज्यावर गोलंदाज आणि विकेटकिपर डिकॉकने आउटसाठीची अपील केली. पण तो चेंडू नो बॉल होता. ज्यावरून हसन अली आणि डीकॉक यांच्यात वाद सुरू झाला. वाचा- वाचा- दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हसन अलीला बाद न दिल्याने निराश झाले. त्यानंतर हसन काही शब्द डीकॉकला बोलला त्यावरुन तो भडकला. दोघांच्या काही शाब्दिक वाद सुरू झाल्यावर दोन्ही अंपायर त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी वाद मिटवला. वाचा- पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२० धावात संपुष्ठात आला. पाकिस्तानने उत्तरादाखल ३७८ धावा केल्या. फवाद आलम शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेला फक्त २४५ धावा करता आल्या. पाकिस्तानला विजयासाठी ९० धावांचे आव्हान होते. त्यांनी ३ विकेटच्या बदल्यात ते पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतील. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t97sf5

जय शहा यांना मिळाले आणखी एक पद; या क्रिकेट संघटनेचे झाले अध्यक्ष

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ()चे सचिव यांची अचानक () च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंह धूमल यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. वाचा- धुमल यांनी ट्विटवरून जय शहा यांची नियुक्ती झाल्याचे आणि त्यांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले. त्यांच्या नेतृत्वाखाली एसीसी मोठी प्रगती करेल आणि संपूर्ण आशिया क्रिकेटला फायदा होईल. शहा यांना कार्यकळासाठी माझ्या शुभेच्छा. वाचा- जय शहा आशिया क्रिकेट परिषदेचा कारभार नजमुल हसन पापोन यांच्याकडून घेतील. आशिया क्रिकेट परिषदेची स्थापना १९८३ साली झाली होती. या परिषदेचा हेतू आशिया खंडात क्रिकेटला प्रोत्सहान देण्याचा आहे. या परिषदे सध्या २५ सदस्य आहेत. वाचा- वाचा- ३२ वर्षीय जय शहा सध्या बीसीसीआयमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते २३ ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआयचे सचिव आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या रुग्णालयात असल्याने शहा यांच्याकडे बीसीसीआयचा सर्व कारभार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका त्याच बरोबर देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धा याचे नियोजनासाठी ते काम करत आहेत. वाचा- शहा यांनी आज सध्या सुरू असलेल्या सैय्यद अली टी-२० स्पर्धेनंतर रणजी ट्रॉफी ऐवजी विजय हजारे ट्रॉफी होणार असल्याचे जाहीर केले होते. देशातील राज्य क्रिकेट संघटनांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3afqPuh

विराट कोहलीकडून मिळाले खास गिफ्ट; पराभवानंतर देखील खुश झाली वॉर्नरची मुलगी

नवी दिल्ली: Daughter Viral Photo ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची मुलगी इंडी रे ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फार मोठी फॅन आहे. वॉर्नरने अनेक वेळा याचा उल्लेख केलाय. ही गोष्ट विराटला देखील माहिती आहे. आता विराटने त्याच्या या सर्वात लहान अशा फॅनला एक खास गिफ्ट दिले आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. वाचा- विराट कोहलीने वॉर्नरच्या मुलीला स्वत:ची कसोटी सामन्यातील जर्सी भेट दिली आहे. वॉर्नरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खुप व्हायरल होत आहे. वाचा- मला माहिती आहे की आम्ही मालिका गमावली आहे. पण आमच्याकडे एक मुलगी आहे जी फार खुस आहे. धन्यवाद विराट कोहली. कसोटी संघाची जर्सी दिल्या बद्दल इंडीला ही जर्सी खुप आवडली. तिला वडील आणि एरॉन फिंचसह खुप आवडतो, असे वॉर्नरने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे. वाचा- वाचा- काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मुलगी झाली. विराटने मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा वॉर्नरने शुभेच्छा देताना विराटला काही टिप्स हव्या असतील तर मला मेसेज कर, असे म्हटले होते. वाचा- विराट आणि वॉर्नर यांची मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे. वॉर्नरला भारतीय संस्कृती फार आडते. त्याच्या सोशल मीडियावर नेहमी भारतीय गाण्यांमधील डान्स दिसतात. तो आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3coDJIZ

IPL 2021 Auction: या चार भारतीय खेळाडूंचा लिलाव जवळ जवळ अशक्य

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेतील आठ संघांनी रिटेन आणि रिलीझ केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता पुढील महिन्यात १८ तारखेला मिनी लिलाव चेन्नईत होणार आहे. या लिलावात असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघांनी रिलीझ केले आहे. पण आता २०२१च्या हंगामासाठी अन्य संघांकडून त्यांची खरेदी होण्याची शक्यता जवळ जवळ अशक्य आहे. या यादीत चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- (Harbhajan Singh)- भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आता ४० वर्षाचा झाला आहे. हरभजनने गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली होती. हरभजन गेल्या दोन हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. पण या वर्षी त्याने स्वत:हून चेन्नई संघाला रिलीझ करण्याची विनंती केली. वयानुसार हरभजनच्या फिरकीमध्ये तशी जादू राहिली नाही. त्याच बरोबर तो मोठ्या कालावधीपासून क्रिकेट मैदानातून दूर आहे. त्यामुळेच या वर्षी त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक असेल. वाचा- (Murali Vijay)- चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मुरली विजय याला या वर्षी रिलीझ करण्यात आले आहे. २०१६ साली मुरली विजयने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ४५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने खास कामगिरी केली नाही. २०१७ मध्ये त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. तर २०१८ मध्ये एक सामना खेळण्यास मिळाला. २०१९ मध्ये दोन तर २०२० मध्ये फक्त ३ मॅच खेळण्याची संधी त्याला मिळाली. आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो खेळला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता या वर्षी लिलावात त्याची विक्री होणार नाही असे दिसते. वाचा- (Karun Nair)- गेल्या १० टी-२० सामन्यात नायरने फक्त ५० धावा केल्या आहेत. सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत देखील तो अपयशी ठरला. त्याची सर्वोच्च धावसंख्या २७ इतकी आहे आणि अशा कामगिरीच्या जोरावर कोणताही संघ त्याच्यावर बोली लावणार नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या करुण नायरने गेल्या हंगामात ४ सामने खेळेल तर त्याच्या आधीच्या सामन्यात फक्त १ मॅच खेळली होती. वाचा- ... (Kedar Jadhav)- भारताच्या या फलंदाजाने सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत वेगवान अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या या खेळाडूला संघाने या वर्षी रिलीझ केले. केदार आता ३५ वर्षाचा झाला आहे त्यामुळे अन्य खेळाडूंप्रमाणे त्याला संघात घेण्यास फार संघ उत्सुक असणार नाहीत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NHaG9e

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीला विक्रमाची संधी; हव्यात फक्त १४ धावा

नवी दिल्ली: 2021 भारतीय क्रिकेट संघाचा नियमीत कर्णधार ( ) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर येण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याने बाळाच्या जन्मासाठी सुट्टी घेतली होती. आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो पुन्हा संघाचे नेतृत्व करणार आहे. वाचा- विराट कोहलीने भारतीय संघाकडून खेळण्यास सुरूवात केल्यापासून २०२० हे असे एकमेव वर्ष ठरले ज्यात त्याला शतक करता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला शतकाची संधी होती पण तो धावबाद झाला. त्याआधी वर्षभर करोनामुळे भारतीय संघाला फार क्रिकेट खेळता आले नाही. वाचा- आता विराट २०२१ची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटीत विराट कोहलीला एक विक्रम करण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध विराटने मोठी खेळी करावी अशी प्रत्येक भारतीय चाहत्याची इच्छा असेलच, पण पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात विराटला वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांना मागे टाकण्याची संधी आहे. वाचा- विराटने कसोटीत कर्णधार म्हणून आतापर्यंत ५ हजार २२० धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध १४ धावा करताच तो लॉईड यांना मागे टाकून कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचेल. वाचा- या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅहम स्मिथ ८ हजार ६५९ धावांसह पहिल्या, ६ हजार ६२३ धावांसह एलन बॉर्डर दुसऱ्या तर रिकी पॉटिंग ६ हजार ५४२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3px0n5S

BCCI ने भारतीय क्रिकेटमधील मोठा निर्णय घेतला; ८७ वर्षात प्रथमच...

नवी दिल्ली: गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. देशात करोना परिस्थिती सुधारल्यानंतर राष्ट्रीय स्थरावरील स्पर्धांना सुरूवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा सुरू झाली. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाचा- देशातील प्रतिष्ठीत अशी स्पर्धेचे या वर्षी आयोजन केले जाणार नाही. ८७ वर्षात प्रथमच असे घडणार आहे की जेव्हा रणजी स्पर्धा होणार नाही. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफरने करोनाचा विचार करता विजय हजारे, दलीप आणि देवधर ट्रॉफी या स्पर्धा रद्द करून त्याच्या जागी रणजी ट्रॉफीचे आयोजन करावे असे मत व्यक्त केले होते. पण बीसीसीआयने या सत्रात विजय हजारे स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- ... विजय हजारे ट्रॉफीसह बीसीसीआयने महिला सिनिअर वनडे ट्रॉफी आणि अंडर १९ क्रिकेट मध्ये विनू मांकड वनडे ट्रॉफीचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. बीसीसीआयचे सचिव यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. वाचा- राज्य संघटनांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय हजारे ट्रॉफीसह सिनिअर महिला वनडे ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. त्याच बरोबर विनू मांकड ट्रॉफी (१९ वर्षाखालील) चे आयोजन होणार आहे, असे शहा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. वाचा- करोना व्हायरसमुळे भारतात पुढील महिन्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून होणार आहे. या महिन्यात बीसीसीआयने देशांतर्गत सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेची अंतिम लढत ३१ जानेवारी रोजी होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iZLPcg

Syed Mushtaq Ali Trophy: उद्या ठरणार सुपर संडे; या दोन संघात होणार अंतिम सामना

अहमदाबाद: कर्णधार केदार देवधर (Kedar Devdhar) आणि कार्तिक ककाडे (Kartik Kakade) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बडोदा संघाने () च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये त्यांनी पंजाबचा २५ धावांनी पराभव () केला. आता अंतिम सामन्यात त्यांची लढत तामिळनाडू विरुद्ध होईल. वाचा- बडोदाचा सलामीवीर केदार देवधरने ४९ चेंडूत चार चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावा केल्या. तर कार्तिकने नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. ज्याच्या जोरावर बडोदाने २० षटकात ३ बाद १६० ही आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. वाचा- कार्तिकने ४१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. कार्तिक आणि देवधर यांच्या फलंदाजीमुळे बडोदाने अखेरच्या ८ षटकात ८५ धावा केल्या. त्यानंतर बडोदाच्या लुकमान मेरिवाल (३ विकेट) आणि निनाद राथवा (२ विकेट)यांनी पंजाबला १३५ धावात रोखले आणि विजय साकारला. वाचा- ... वाचा- पंजाबकडून कर्णधार मनदीप सिंगने नाबाद ४२ धावा केल्या. गुरुकीरत सिंगने ३९ धावांचे योगदान दिले. पंजाबची सुरूवात खराब झाली. २१ धावांवर त्यांचे दोन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर १४ षटकात ४ बाद ७० अशी अवस्था होती. पंजाबला ५ षटाकत विजयासाठी ७० धावा हव्या होत्या. पण धावा करण्यात अपयशी ठरले. याआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये तामिळनाडूने राजस्थानचा सात विकेटनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. वाचा- मुश्ताक अली ट्रॉफीची अंतिम लढत ३१ जानेवारी रोजी होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MHuZ5O

Sourav Ganguly: रुग्णालयाने दिले गांगुलीच्या प्रकृतीसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट

कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. गांगुलीला आता ICU मधून खासगी रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. रुग्णालयातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अँजिओप्लॅस्टीनंतर गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वाचा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीवर गुरुवारी पुन्हा एकदा अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंटही बसवण्यात आले होते. त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंटही बसवण्यात आले होते. वाचा- आता गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रात्री चांगली झोप देखील लागली. आरोग्या संदर्भातील सर्व गोष्टी सामान्य आहेत. आता त्यांना आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचे रुग्णालयाती अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा- प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या पथकाने गांगुलीवर गुरुवारी अँजिओप्लॅस्टी केली होती. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. छातीत दुखू लागल्याने बुधवारी गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यात गांगुलीला दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावे लागले. वाचा- याआधी सौरव गांगुलीला हृदय विकाराचा सौम्य धक्का बसला होता. तेव्हा त्याला ट्रिपल वेसेल डिजीज असल्याचे समोर आले होते. गांगुलीला सर्व प्रथम दोन जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3af62H7

अजिंक्यने कांगारूचे चित्र असलेला केक कापला नाही; उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज ()ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले आणि ऐतिहासिक विजय मिळून दिला. विराट कोहलीच्या गैरहजेरीत आणि महत्त्वाचे गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर असताना अजिंक्यने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत केले. या विजयानंतर अजिंक्यचे मायदेशात जंगी स्वागत झाले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ने विजय मिळवल्यानंतर प्रथम विमानतळावर आणि नंतर घरी त्याच्या सोसायटीमधील लोकांनी त्याचे जंगी स्वागत केले. ढोल ताशे आणि तुतारीने अजिंक्यचे स्वागत करण्यात आले होते. या निमित्ताने अजिंक्यसाठी केक देखील तयार करण्यात आला. हा केक कांगारुचा होता. पण अजिंक्यने तो कापण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी यासंदर्भात अजिंक्यला प्रश्न विचारला असता त्याने त्यावर जे उत्तर दिले त्याने तुम्हाला अजिंक्यचा अभिमान वाटेल. अजिंक्य म्हणाला, केकवर कांगारू प्राणी होता. हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे मी तो केक कापला नाही. मला वाटते की कोणाच्या सम्मानाला धक्का लागू नये. वाचा- तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केल्यानंतर देखील जय-पराजय नंतर देखील तुम्ही त्यांना सम्मान देण्याची गरज आहे. तुम्ही भलेही विजय मिळवला असला, इतिहास घडवला असला तरी प्रतिस्पर्धी संघाला सम्मान दिला पाहिजे. यामुळेच मी तो केक कापण्यास नकार दिला, असे अजिंक्य म्हणाला. वाचा- ... अजिंक्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मुंबईत दाखल झाला तेव्हा त्याची पत्नी राधिका आणि मुलगी विमानतळावर स्वागतासाठी आले होते. तेथून तो घरी आला. अजिंक्य ज्या सोसायटीमध्ये राहतो तेथील सर्व जण स्वागतासाठी उपस्थित होते. त्याच्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आले होते. त्याच बरोबर ढोल-ताशे आणि तुतारी वाजवण्यात आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39sIVK1

Friday, January 29, 2021

IND vs ENG 2021: भारत विरुद्ध इंग्लंड; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, कधी, कोठे होणार सामने आणि लाइव्ह टेलिकास्ट

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेची सुरूवात ५ फेब्रुवारीपासून होणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. या शिवाय पाच टी-२० लढती आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटीची सुरुवात चेन्नईतून होईल. पहिल्या दोन कसोटी चेन्नईत होणार आहेत. त्यानंतरच्या दोन कसोटी या अहमदाबाद येथील होतील. चेन्नईत आतापर्यंत झालेल्या ३२ पैकी १४ कसोटी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सहा सामन्यात पराभव झाला तर ११ सामने ड्रॉ झाले आहेत. चेन्नईत भारताने ७ बाद ७५९ ही सर्वोच्च धावसंख्या २१६ साली इंग्लंडविरुद्ध केली होती. तर याच मैदानावर ८३ ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. १९७७ साली इंग्लंडने भारताचा ८३ वर ऑल आउट केला होता. या मैदानावर सुनील गावस्कर यांनी १२ कसोटीत १ हजार १८ धावा केल्या आहेत. त्यांनी चेन्नईत ३ शतक झळकावली आहेत. वाचा- या शिवाय चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ९ पैकी ५ कसोटी विजय मिळवला आहे. या दोन्ही संघातील अखेरच्या लढतीत भारताने ७५ धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने ३०३ तर केएल राहुलने १९९ धावा केल्या होत्या. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी चांगली झाल्याने पहिल्या दोन्ही कसोटीत भारताचे पारडे जड मानले जाते. जाणून घेऊयात भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक... (ind vs eng 2021 full schedule) कसोटी मालिका पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी- सकाळी ९.३० वाजता दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी- सकाळी ९.३० वाजता तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट)- दुपारी २ वाजता चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च- सकाळी ९.३० वाजता वाचा- टी-२० मालिकेचे वेळापत्रक पहिली मॅच- १२ मार्च, संध्याकाळी ६ वाजता दुसरी मॅच- १४ मार्च, संध्याकाळी ६ वाजता तिसरी मॅच- १६ मार्च, संध्याकाळी ६ वाजता चौथी मॅच- १८ मार्च, संध्याकाळी ६ वाजता पाचवी मॅच- २० मार्च, संध्याकाळी ६ वाजता या सर्व लढती अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर होणार आहेत. वनडे सामन्यांचे वेळापत्रक पहिली वनडे- २३ मार्च, दुपारी २.३० वाजता दुसरी वनडे- २६ मार्च, दुपारी २.३० वाजता तिसरी वनडे- २८ मार्च, सकाळी ९.३० वाजता या सर्व लढती पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होतील. वाचा- लाइव्ह टेलिकास्ट भारत आणि इंग्लंड यांच्यातील सर्व मालिकेचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर होईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39wusgj

Syed Mushtaq Ali Trophy 2021: कार्तिकची स्फोटक फलंदाजी, तामिळनाडू फायनलमध्ये

अहमदाबाद: सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीतील पहिली सेमीफायनल लढत मोटेरा क्रिकेट मैदानावर राजस्थान आणि तामिळनाडू यांच्यात झाली. या महत्त्वाच्या लढतीत तामिळनाडूने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यांनी राजस्थानचा ७ विकेटनी पराभव केला. वाचा- पहिल्या सेमीफायनल लढतीत राजस्थानचा कर्णधार अशोक मेनारियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकात ९ बाद १५४ धावा केल्या. तामिळनाडूला विजयासाठी १५५ धावांची गरज होती. अरुण कार्तिकच्या धमाकेदार फलंदाजीच्या तामिळनाडूने विजयाचे लक्ष्य १८.४ षटकात आणि ३ विकेटच्या मोबदल्यात पार केले. वाचा- अंतिम लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवात खराब झाली. हरी निशांत चार धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसरी विकेट देखील लवकर पडली. एन जगदीशन याने २८ धावा केल्या आणि संघाला स्थिर केले. पण तो देखील मोठी धावसंख्या करू शकला नाही. तिसरी विकेट पडल्यानंतर अरुण फलंदाजीला आला. त्याने नाबाद ८९ धावांची धमाकेदार फलंदाजी केली आणि विजय मिळवून दिला. तर कर्णधार दिनेश कार्तिकने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. वाचा- वाचा- अरुण कार्तिकने ५४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १६४.८१च्या स्ट्राइक रेटने नाबाद ८९ धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार अशोक मेनारियाने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो ५१ धावांवर बाद झाला. राजस्थानकडून अर्जित गुप्ताने ४५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L3CYdg

IND vs ENG: इंग्लंडवर विजय मिळवण्यासाठी भारतापुढे या 'रनमिशन'चे मोठे आव्हान

चेन्नई, : ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यावर आता भारतापुढे आव्हान आहे ते इंग्लंडचे. भारत आणि इंग्लंड यांच्यांमध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पण भारताला जर इंग्लंडवर विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्यापुढे एका खेळाडूचे सर्वात मोठे आव्हान असेल. भारताला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर सर्वात मोठे आव्हान असेल ते कर्णधार जो रुटचे. कारण रुट सध्याच्या घडीला अफलातून फॉर्ममध्ये आहे, त्याचबरोबर करोनानंतर झालेल्या सर्वच कसोटी मालिकेत रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या मालिकेत भारतापुढे सर्वात मोठे आव्हान हे जो रुटचे असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रुटने तब्बल १०६च्या सरासरीने ४२६ धावा केल्या होत्या. यामध्ये २२८ धावांच्या अफलातून खेळीचाही समावेश होता. त्याचबरोबर या दौऱ्यात रुटने १८६ धावांची खेळीही साकारली होती. यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यातही रुटने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे रुट ही इंग्लंडसाठी रनमशिन ठरलेली आहे. त्यामुळे रुटला लवकर बाद कसे करायचे, याची रणनिती भारतीय संघाला सर्वप्रथम आखावी लागणार आहे. जर रुट एकदा का स्थिरस्थावर झाला तर त्याला बाद करणे भारतीय संघासाठी नक्कीच सोपे नसेल. रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गेल्या काही महिन्यांत मिळवले हे मालिका विजय करोनानंतर क्रिकेट विश्वात पहिली मालिका इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळवली गेली होती. या मालिकेत रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर पाकिस्तानचा संघ गेला होता. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने १-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने २-० असा धमाकेदार विजय मिळवला होता. त्यामुळे रुटचा विजयरथ विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रोखणार का, याची उत्सुकता सर्वच क्रिकेट चाहत्यांना नक्की असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r6tvku

IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूने सांगितले, या कारणामुळे भारत कसोटी मालिका जिंकणार

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा विजय होईल अशी भविष्यवाणी इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने केली आहे. दोन्ही संघातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत होणार आहेत. गेल्या वेळी म्हणजेच २०१६ साली जेव्हा चेन्नईत दोन्ही संघा दरम्यान कसोटी सामना झाला होता तेव्हा इंग्लंडचा ७५ धावांनी पराभव झाला होता. या दोन्ही संघात चेन्नईत ९ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी ५ भारताने तर ३ इंग्लंडने जिंकलेत. तर १९८२ साली झालेला सामना ड्रॉ झाला होता. वाचा- इंग्लंडचा माजी फिरकीपटू ()च्या मते इंग्लंडविरुद्धची आगामी कसोटी मालिका भारत विजय मिळवू शकतो. कारण ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. मला वाटत नाही की इंग्लंडचा वाइटवॉश होईल. पण भारत मजबूत आहे आणि त्याला विजयाची संधी अधिक आहे. वाचा- इंग्लंडने २०१२-१३ साली अखेरची कसोटी मालिका भारतात जिंकली होती. तेव्हा पनेसर इंग्लंडकडून खेळत होता. त्याने ३ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडकडे मजबूत जलद गोलंदाज आहेत. पण त्यांची फलंदाजी कमकूवत आहे. फिरकी गोलंदाजांना ते लवकर बाद होतात. भारत यावर अधिक भर देईल. त्यांनी मालिका ४-०ने जिंकली तर मोठा धक्का असेल. पण माझ्या मते मालिका २-१ किंवा २-० अशी होईल. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मालिका २-० अशी जिंकली. भारतीय संघाचा परदेशातील हा सर्वात खास विजय आहे, असे पनेसर म्हणाला. संघाचे कोच रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटीत ३६ वर बाद झाल्यानंतर संघाला सकारात्मकतेने मार्गदर्शन केले. वाचा- भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्याची सुरूवात सौरव गांगुलीने केली होती. त्याचा व्यवस्थापनात सहभाग झाल्याने मोठे बदल झाले आहेत. इंग्लंड संघातील खेळाडू फिरकीपेक्षा जलद गोलंदाजांना अधिक चांगल्या पद्धतीने खेळतात. केव्हिन पीटरसन प्रमाणे अन्य खेळाडू फिरकीपटूंच्या विरुद्ध चांगली फलंदाजी करू शकत नाहीत, असे तो म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r2GKTv

इंग्लंडवर विजय मिळवल्यावर जेव्हा युवराजने सचिनला उचलून घेतले होते, जाणून घ्या तो अविस्मरणीय क्षण

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील काही क्षण आपण कधीच विसरु शकत नाही. लॉर्ड्सवर भारताने जिंकलेला अंतिम सामना आणि सौरव गांगुलीने काढलेले टी-शर्ट अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर असेल. पण क्रिकेटच्या इतिहासात असाच एक अविस्मरणीय क्षण आहे, ज्यावेळी इंग्लंडवर विजय मिळवल्यावर सिक्सर किंग युवराज सिंगने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला चक्क उचलून घेतले होते. नेमकं काय घडलं होतं, पाहा...मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. या हल्ल्यानंतर इंग्लंडच्या संघाने दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर इंग्लंडचा संघ डिसेंबर महिन्यात भारतात पुन्हा क्रिकेट खेळायला आला. इंग्लंडने यावेळी आपला दुसरा डाव ३११ धावांवर घोषित केला होता आणि भारतापुढे विजयासाठी ३८७ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी धडाकेबाज सलामी दिली होती. या दोघांनी फक्त १०८ चेंडूंमध्ये १०० धावांची भागीदारी रचली होती. सेहवागने तर इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली होती आणि फक्त ३२ चेंडूंत आपले अर्धशतकही झळकावले होते. सेहवागने यावेळी ६८ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी साकारुन भारताच्या विजयाचा पाया रचला होता. गंभीरनेही यावेळी ६६ धावांचे योगदान दिले होते. सेहवाग आणि गंभीर बाद झाले तेव्हा भारताची २ बाद १४१ अशी अवस्था होती. पण त्यानंतर चार धावांमध्येच राहुल द्रविड आऊट झाला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानात उतरला होता. सचिनने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर चांगली भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला होता. त्यानंतर सचिनने युवराज सिंगबरोबर मोठी भागीदारी रचली होती आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. सचिनने विनिंग शॉट मारत यावेळी आपले शतकही पूर्ण केले होते. त्यानंतर युवराजने सचिनला भर मैदानात उचलून घेतले होते. सचिनने यावेळी आपले हे शतक मुंबईच्या हल्ल्यातील शहिद झालेल्या व्यक्तींना समर्पित केले होते. सचिनने यावेळी नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती, तर युवराजने नाबाद ८५ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3opNfOB

तब्बल १० वर्षांनी संघात आला अन् सलग दोन शतकं लगावत निवड समितीचे तोंड केले बंद

नवी दिल्ली : तब्बल १० वर्षे तो संघाच्या बाहेर होता. या १० वर्षांत निवड समितीने त्याला एकदाही संधी दिली नाही. पण जेव्हा १० वर्षांनी या क्रिकेटपटूला संधी मिळाली तेव्हा त्याने या संधाचे सोने केले. संधी मिळाल्यावर सलग दोन शतके लगावत या फलंदाजाने निवड समितीचे तोंड बंद केले आहे. या खेळाडूच्या शतकाच्या जोरावर संघाला सहज विजय मिळवता आला. त्याचबरोबर या शतकवीर खेळाडूला यावेळी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या बिकट अवस्थेत या खेळाडूला संधी देण्यात आली. खेळपट्टी आणि वातावरण गोलंदाजीला पोषक असतानाही या खेळाडूने शतक झळकावत आपली निवड सार्थ करून दाखवली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानच्या फवाद आलमने शतक झळकावले. आलमचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्यामुळे तब्बल १० वर्षे मला संधी का दिली नाही, असा सवाल आलमने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या निवड समितीला विचारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आलमने ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०९ धावांची दमदार खेळी साकरली. आलमच्या या शतकाच्या जोरावरच पाकिस्तानला ३७८ धावा करता आल्या आणि १५८ धावांची मजबूत आघाडीही घेता आली. आलमच्या या शतकाच्या योगदानामुळेच पाकिस्तानला हा सामना जिंकताही आला. पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आलमलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले. त्यामुळे तब्बल १० वर्षे या खेळाडूला संधी का मिळाली नाही, असा सवाल आता विचारला जात आहे. आलमच्या या शतकी खेळीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने निवड समितीला प्रश्न विचारला आहे. अख्तरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " तब्बल एक दशक फवाद आलमसारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यासाठी कोण जबाबदार आहे. आलमसारख्या एवढ्या चांगल्या फलंदाजाला संघाबाहेर एवढी वर्षे का ठेवण्यात आले, असा माझा निवड समितीला प्रश्न आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3otF5Vl

IND vs ENG: भारतीय खेळाडूंची पहिली करोना चाचणी झाली, पाहा आता पुढे काय होणार...

चेन्नई, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. यावेळी भारतीय संघांतील खेळाडूंची पहिली करोना चाचणा झाली आहे. आता यापुढे खेळाडूंना काय करावे लागणार आहे, याचा कार्यक्रमही बीसीसीआयने तयार केला आहे. भारतीय खेळाडूंची पहिला करोना चाचणी झाली असून त्यांना आता क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय खेळाडू यावेळी सात दिवस क्वारंटाइनमध्ये असतील. या कालावधीमध्ये खेळाडूंच्या अजून दोन करोना चाचण्या होणार आहेत. या दोन करोना चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यावर खेळाडूंना सामना खेळता येणार आहे. भारतीय खेळाडू सात दिवसांसाठी क्वारंटाइन असले तरी त्यांना सराव आणि व्यायाम करावाच लागणार आहे. भारतीय संघातील सहाय्यक प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना व्हिडीओद्वारे व्यायामाचे प्रकार सांगणार आहेत, त्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंना व्यायाम करावा लागणार आहे. या सात दिवसांच्या क्वारंटाइननंतर सर्व खेळाडू मैदानात एकत्रितपणे सराव करू शकतात. त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची रणनिती ठरवण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला तरी भारतीय खेळाडूंच्या अन्य दोन करोना चाचण्यांचे अहवाल नेमके काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ बुधवारी दाखल झाला. इंग्लंडच्या संघातील सर्व व्यक्तींची यावेळी करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतरच इंग्लंडच्या संघाला हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता सात दिवस इंग्लंडच्या संघाला क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला फक्त तीन दिवसच सराव करण्यासाठी मिळणार आहेत. अजिंक्य रहाणेकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुवर्णसंधी आहे. कारण या मालिकेत अजिंक्य बरेच विक्रम मोडू शकतो, हे आता समोर आले आहे. मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जर अजिंक्यने अशीच कामगिरी केली तर त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, पॉली उम्रीगर, गुंडप्पा विश्वनाथ आणि मुरली विजय यांचे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YmsuZo

Sourav Ganguly Health Update: शस्त्रक्रीयेनंतर कशी आहे सौरव गांगुलींची प्रकृती, डॉक्टरांनी दिले महत्वाचे अपडेट्स

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. त्याचबरोबर गांगुली यांच्यावर शस्त्रक्रीया करताना त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंटही बसवण्यात आले होते. गांगुली यांना एकाच महिन्यात दोनदा अँजिओप्लॅटी करावी लागली. त्यानंतर गांगुली यांची प्रकृती नेमकी कशी आहे, याबाबत अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी महत्वाचे अपडेट्स दिले आहेत. अपोलो हॉस्पिटलमधून यावेळी सांगितले की, " गांगुली यांचा आजही काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. अँजिओप्लॅस्टी झाल्यावर गांगुली यांची प्रकृती सध्याच्या घडीला स्थिर आहे. या शस्त्रक्रीयेनंतर गांगुली यांना रात्री चांगली झोपही लागली. आतापर्यंतचे गांगुली यांचे सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आहेत. वरिष्ठ डॉक्टर गांगुली यांचे पुन्हा एकदा चेकअप करणार आहेत. त्यानंतरच गांगुली यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे." गांगुली यांची काल सकाळी अँजिओग्राम आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या उपस्थित आज गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. यावेळी गांगुलीचे कौटुंबिक डॉक्टर आफताभ खानही उपस्थित होते. गांगुली यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी ही यशस्वीपणे झाली आहे. अँजिओप्लास्टीनंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. गांगुली यांना जेव्हा यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या तीन धमण्यांमध्ये रक्त प्रवाह योग्यपद्धतीने होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी गांगुली यांच्या एका धमनीमध्ये स्टेंट लावण्यात आला होता आणि त्यावेळी अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. बाकीच्या दोन धमन्यांमध्ये काही कालावधीनंतर स्टेंट बसवण्याचा निर्णय त्यावेळी डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर सात जानेवारीला गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण आज झालेल्या शस्त्रक्रीयेमध्ये गांगुली यांच्या दोन धमन्यांमध्ये यावेळी स्टेंट बसवण्यात आले आहेत. गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी गांगुलीची भेटही घेतली. यावेळी ममता यांनी गांगुली यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सौरव गांगुली यांची प्रकृती आता उत्तम आहे आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे ममता यांनी सांगितले. ममता यांच्यानंतर वरिष्ठ माकपा नेता अशोक भट्टाचार्य यांनीही गांगुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ptDNe9

IND vs ENG: अजिंक्य रहाणेकडे सुवर्णसंधी, इंग्लंडविरुद्ध मोडू शकतो हे महत्वाचे विक्रम

चेन्नई, : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुवर्णसंधी आहे. कारण या मालिकेत अजिंक्य बरेच विक्रम मोडू शकतो, हे आता समोर आले आहे. मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जर अजिंक्यने अशीच कामगिरी केली तर त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, पॉली उम्रीगर, गुंडप्पा विश्वनाथ आणि मुरली विजय यांचे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल. अजिंक्यने आतापर्यंत ६९ कसोटी सामन्यांमध्ये ४४७१ धावा केल्या आहेत, यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे. जर इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अजिंक्यने ४०६ धावा केल्या, तर त्याला महेंद्रसिंग धोनीला मागे टाकण्याची नामी संधी असेल. धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या आहेत. त्यामुळे अजिंक्यने या मालिकेत दमदार कामगिरी केली तर त्याला धोनीलाही मागे सोडता येईल. अजिंक्यच्या नावावर आता १२ शतके आहेत. पॉली उम्रीगर आणि मुरली विजय यांच्या नावावरही प्रत्येकी १२ शतके आहेत. त्यामुळे अजिंक्यने या मालिकेत जर एक शतक झळकावले तर त्याला उम्रीगर आणि मुरली विजय यांना मागे सोडता येणार आहे. त्याचबरोबर अजिंक्यने या मालिकेत जर दोन शतके लगावली तर त्याला गुंडप्पा विश्वनाथ यांच्या १४ शतकांची बरोबरी करता येणार आहे. पण जर अजिंक्यने इंग्लंडविरुद्धच्या आठ डावांमध्ये तीन शतके लगावली तर त्याला विश्वनाथ यांचा शतकांचा विक्रमही मागे सोडता येईल. इंग्लंडविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ही अजिंक्यसाठी फार महत्वाची ठरणार आहे. कारण अजिंक्य चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे अजिंक्य या मालिकेत किती धावा करतो आणि कोणचा विक्रम मोडतो, याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष असेल. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाचा दौरा चांगलाच गाजवला होता. पण आता अजिंक्यकडे कर्णधारपद नसले तरी त्याच्याकडून कशी कामगिरी होते आणि तो किती धावा करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MdKXF6

तेव्हा लोकलमध्ये कोणी ओळखले नव्हते; आता टीम इंडियाचा स्टार झालाय हा खेळाडू

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात धमाकेदार कामगिरी करून () स्टार झाला. भारतीय संघाच्या विजयाचा मुख्य नायक म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. मायदेशात परतल्यानंतर शार्दुलचे जोरदार स्वागत झाले. चाहते त्याला भेटण्यासाठी आतुर झालेले दिसतात. पण तीन वर्षापूर्वी जेव्हा तो पहिल्या दौऱ्यातून घरी येत होता तेव्हा त्याला कोणी ओळखले देखील नव्हते. वाचा- शार्दुलने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन कसोटी खेळण्याआधी एकच कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात देखील १० चेंडू टाकल्यानंतर त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर झाला. ब्रिस्बेन कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली. मायदेशात आल्यावर शार्दुलचे विमानतळावर आणि नंतर घरी जोरदार स्वागत झाले. पण २०१८ साली जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून मुंबईत परतला होता. तेव्हा त्याने अंधेरीतून पालघरला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडली होती. प्रवाशांनी भरलेल्या त्या लोकल रेल्वेत भारताच्या या स्टार गोलंदाजाला एकानेही ओळखले नाही. वाचा- एका मुलाखतीत शार्दुल म्हणाला, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर मी घरी पालघरला जाण्यासाठी अंधेरीतून लोकल पकडली. मी हेडफोन लावला होता आणि घरी लवकर जाण्यासाठी लोकल पकडली होती. जे लोक मला पाहत होते ते विचार करत होते की मी खरच शार्दुल ठाकूर आहे की नाही. लोकलमधील काही कॉलेजच्या मुलांनी माझा फोटो गुगलवर सर्च केला आणि मीच शार्दुल ठाकूर निश्चित केले. त्यानंतर त्यांनी सेल्फीसाठी विचारले. मी त्यांना पालघरला पोहोचल्यानंतर सेल्फी घेऊ असे म्हटले. माझ्या सोबत प्रवास करणाऱ्या अनेकांना आश्चर्य वाटत होते की ते भारतीय क्रिकेटपटू सोबत प्रवास करत आहेत. वाचा- शार्दुल आणि मुंबईच्या लोकल रेल्वेचा खुप जवळचे नाते आहे. तो रोज सकाळी पाचची लोकल गाडी पकडून बोरिवलीला जात असे, जेणेकरून शाळेकडून क्रिकेट खेळू शकले. यामुळेच त्याला पालघर एक्स्प्रेस असे नाव पडले. रोजचा ३ तासाच्या प्रवासाने शार्दुलला मानसिकदृट्या मजबूत केले. ब्रिस्बेन कसोटीत शार्दुलने ७ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ६७ धावा केल्या. भारत पहिल्या डावात ६ बाद १८६ अशा अवस्थेत असताना त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KZBG2X

Thursday, January 28, 2021

ICCने केले पाक क्रिकेटपटूला ट्रोल; भारतीयांनी संधी सोडी नाही

दुबई: मैदानावरील एखाद्या घटनेमुळे क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची घटना काही नवी नाही. सामना सुरू असताना अशा अनेक घटना ज्यावर खेळाडू ट्रोल होतात. पण जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या संघटनेने जर एखाद्या खेळाडूला ट्रोल केले तर... होय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने पाकिस्तानच्या एका खेळाडूला चक्क सोशल मीडियावरून ट्रोल कले आहे. आता आयसीसीनेच ट्रोल केले म्हटल्यावर अन्य युझर्स मागे कसे राहतील. वाचा- पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी जलद गोलंदाज हसन अलीचा एक फोटो आयसीसीने गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केला. आयसीसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हसन अलीचे दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो एक शानदार शॉट मारताना दिसतोय. या फोटोत या फोटोला आयसीसीने प्रोफाइल फोटो म्हटले आहे तर दुसऱ्या फोटोत त्याचा पूर्ण फोटो दाखवला आहे ज्यात तो बोल्ड झालेला दिसतोय. या फोटोला आयसीसीने फूल्ल फोटो असे म्हटलय आणि हसणारी इमोजी टाकली आहे. वाचा- वाचा- आयसीसीने हसन अलीला ट्रोल केल्यामुळे बाकीचे युझर्सने ही संधी सोडली नाही. पाकिस्तान नेहमी भारतावर टीका करत असते. अशात भारतीय युझर्सनी ही संधी सोडली नाही. कराचीत सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने सामन्यावर पकड मिळवली होती. आफ्रिकेने ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. त्याच्याकडे फक्त २९ धावांची आघाडी आहे. पाकने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ckoLDS

IND vs AUS : फक्त चार बोटांनी बॅट पकडून का केली फलंदाजी, पुजाराने केला मोठा खुलासा

नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयात भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराचाही मोलाचा वाटा आहे. पण या दौऱ्यातील फलंदाजीबाबत पुजाराने आज एक मोठा खुलासा केला आहे. आपण फक्त चार बोटांनी बॅट पकडून का फलंदाजी करत होतो, यावर पुजाराने प्रकाशझोत टाकला आहे. पुजारा यावेळी म्हणाला की, " संघाला माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहे, हे मला चांगलेच माहिती असते. त्यामुळे मी त्यानुसारच फलंदाजी करत असतो. तुम्हाला फक्त तुमच्या तंत्रावर विश्वास असायला हवा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आमच्यासाठीही खडतर असाच होता. या दौऱ्यात माझ्यावर चार बोटांनी फलंदाजी करायचीही वेळ आली होती. ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती, पण ते करणे माझ्यासाठी भाग होते." पुजारा पुढे म्हणाला की, " मेलबर्न येथे सराव करत असताना मला दुखापत झाली होती. त्यामुळे सिडनी आणि ब्रिस्बेन येथे फलंदाजी करणे माझ्यासाठी सोपेन नव्हते. कारण माझ्या हाताला वेदनाही होत होत्या. त्यावेळी बॅट पकडणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये मला पुन्हा एकदा दुखापत झाली. त्यामुळे माझ्या वेदनाही वाढल्या होत्या. त्यावेळी मला फक्त चार बोटांनीच बॅट पकडावी लागत होते, ही गोष्ट नक्कीच फार अवघड होती. पण ही गोष्ट मला करावी लागली, कारण त्यावाचून कोणताही पर्याय नव्हता." ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी पुजाराने ५६ धावांची दमदार खेळी साकारली आणि भारताचा पराभव होणार नाही, याची काळजी घेतली. यावेळी फलंदाजी करत असताना ११ चेंडू पुजाराच्या अंगावर आदळले. पण पुजाराने यावेळी हार मानली नाही. दुखापत गंभीर असली आणि वेदना जास्त होत असल्या तरी पुजाराने मैदान सोडले नाही. त्यावेळी जर पुजाराने मैदान सोडले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक आक्रमक झाला असता. पण पुजाराने मैदान न सोडता खेळपट्टीवर उभा राहण्याचा निर्णय घेतला. पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3adPuiU

Sourav Ganguly health update: सौरव गांगुली यांच्यावर आज झाली दुसरी शस्त्रक्रीया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली. गांगुली यांच्यावर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिली शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर २६ दिवसांत गांगुली यांच्यावर दुसरी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्याचबरोबर गांगुली यांच्यावर अजूनही काही महत्वाचे उपचार यावेळी करण्यात आले आहेत. अपोलो हॉस्पिटलच्या सूत्रांनी यावेळी सांगितले की, " गांगुली यांच्या आज सकाळी अँजिओग्राम आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला." हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या उपस्थित आज गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. यावेळी गांगुलीचे कौटुंबिक डॉक्टर आफताभ खानही उपस्थित होते. गांगुली यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी ही यशस्वीपणे झाली आहे. अँजिओप्लास्टीनंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. गांगुली यांना जेव्हा यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या तीन धमण्यांमध्ये रक्त प्रवाह योग्यपद्धतीने होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी गांगुली यांच्या एका धमनीमध्ये स्टेंट लावण्यात आला होता आणि त्यावेळी अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. बाकीच्या दोन धमन्यांमध्ये काही कालावधीनंतर स्टेंट बसवण्याचा निर्णय त्यावेळी डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर सात जानेवारीला गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण आज झालेल्या शस्त्रक्रीयेमध्ये गांगुली यांच्या दोन धमन्यांमध्ये यावेळी स्टेंट बसवण्यात आले आहेत. गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी गांगुलीची भेटही घेतली. यावेळी ममता यांनी गांगुली यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सौरव गांगुली यांची प्रकृती आता उत्तम आहे आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे ममता यांनी सांगितले. ममता यांच्यानंतर वरिष्ठ माकपा नेता अशोक भट्टाचार्य यांनीही गांगुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गांगुली यांच्या कुटुंबियांतील सूत्रांनी यावेळी सांगितले की, " मंगळवारी संध्याकाळी आणि बुधवारी सकाळी गांगुली यांच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची पाहणी डॉक्टर आफताभ खान यांनी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onfMUZ

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ने जिंकली. विराट कोहलीसह अन्य महत्त्वाचे खेळाडू संघात नसताना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडवला. या ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या संघात महाराष्ट्रातील चार खेळाडू होते. अशा चार आणि टी-२० मालिकेतील एका खेळाडूसह पाच जणांचा नागरी सत्कार करू,असे आश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला () दिले. वाचा- भारतीय कसोटी संघाचा कर्णधार (), उपकर्णधार , , पृथ्वी शॉ आणि टी-२० मालिकेतील खेळाडू श्रेय्यस अय्यर यांना राज्य सरकारकडून नागरी सत्कार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, वैभव शिंदे व सिध्देश नाक्ती यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन केली. वाचा- या क्रिकेटपटूंचे मुंबई विमानतळावर राज्य सरकारच्यावतीने स्वागत करण्याची योजना होती. पण कोविडच्या मार्गदर्शक तत्वामुळे विमानतळावर आम्ही उपस्थित राहिलो नाहीत. पण या खेळाडूंचा निश्चितपणे राज्य सरकारच्यावतीने जाहिर सत्कार केला जाईल,असे आश्वासन सुनील केदार यांनी मनसेच्या या शिष्टमंडळाला दिले. वाचा- संपूर्ण क्रिकेट विश्वात या विजयाचे कौतुक होत आहे. या विजयात मोलाचा वाटा उचलणा-या राज्यातील या खेळाडूंचा नागरी सत्कार केल्यास देशातील युवकांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन भविष्यात भारताचे नाव क्रीडा क्षेत्रात नक्कीच उंचावेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2McQeg7

IPL 2021: मुंबई इंडियन्सचे नागालँड कनेक्शन; या खेळाडूला ट्रायलसाठी बोलवले

मुंबई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ()ने आता २०२१च्या म्हणजेच १४व्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या १३ पैकी सर्वाधिक ५ हंगामाचे मुंबईने विजेतेपद मिळवले आहे. मुंबई संघाच्या या यशा मागे संघातील खेळाडू ही घरी ताकद आहे. नव्या युवा खेळाडूंना मुंबई संघ नेहमीच प्रोत्साहन देत असते. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सने अशाच एका नव्या खेळाडूला संधी देण्याचे ठरवले आहे. नागालँडच्या याला मुंबई संघाने ट्रायलसाठी निवडले आहे. या शिवाय अन्य खेळाडूंचे मुंबई संघ ट्रायल घेणार आहे. वाचा- केंस हा राज्यातील पहिला खेळाडू आहे ज्याने आयपीएलच्या एखाद्या संघाला आकर्षित केले आहे. १६ वर्षीय फिरकीपटू असलेल्या केंसने सैय्यन मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंसने मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण केले. त्याने चार सामन्यात सात विकेट घेतल्या. पण त्याच्या कामगिरीचा संघाला फायदा झाला नाही. नागालँडने चारही लढती गमावल्या. वाचा- केंसने १२च्या सरासरीने गोलंदाजी केली. मिझोराम विरुद्ध त्याने १६ धावा ३ विकेट घेतल्या होत्या. यात त्याची सरासरी ५.४७ होती. मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्यांनी या युवा खेळाडूशी संपर्क केला. वाचा- नागालँडच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या केंससाठी ही मोठी गोष्ट आहे. मुश्ताक अली स्पर्धेत खेळल्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी देखील उपलब्ध झाला आहे. मुंबई इंडियन्स या युवा खेळाडूवर बोली लावू शकते. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39p1mPD

तू घर जावई हो; ऋषभ पंतला लोकांनी दिला सल्ला

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळून मायदेशात परतलेल्या भारतीय खेळाडूच्या मागे घरातील लोक एका गोष्टीसाठी मागे लागले आहेत. आता यावर काय करायचे यासाठी त्याने चक्क सोशल मीडियावरून मदत मागितली आहे. ऑस्ट्रेलियात मिळालेल्या ऐतिहासिक विजयात भारताचा विकेटकीपर ()ने महत्त्वाचे योगदान दिले होते. सिडनी कसोटी असो की ब्रिस्बेन येथील अखेरची कसोटी या दोन्ही सामन्यात त्याने भारतीय चाहत्यांचे मन जिंकले. वाचा- भारतात परतल्यानंतर पंतचे जोरदार स्वागत झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर घरी परतलेल्या पंतने त्याची एक अडचण सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यावर सल्ला देण्यास सांगितले. वाचा- वाचा- पंत म्हणतो, जेव्हापासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत आलो आहे तेव्हापासून घरातील मागे लागले आहेत की नवे घर घे आता. गुडगाव कसे वाटते? अन्य कोणता पर्याय असेल तर सांगा. त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रत्येक जण स्वत:च्या शहरात त्याला बोलवू लागले. काहींनी जयपूर, काहींनी जोधपूर तर एकाने हैदराबादला घर घेण्यास सांगितले. वाचा- एका युझरने पंतला विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर घेण्यास सांगितले. तर अन्य एकाने लग्न करून घर जावाई हो. म्हणजे घर विकत घेण्याची गरज लागणार नाही असा अजब सल्ला दिलाय. वाचा- एका भारतीय युझरने तर थोडे दिवस थांब पाकिस्तान व्याप्त काश्मीर रिकामे होणार असल्याचे म्हटले आहे. पंतच्या या ट्विटवर अशी अनेक मजेशीर उत्तरे दिला जात आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qUdyxK

ICC ने सुरू केले नवे पुरस्कार; हे भारतीय खेळाडू आहेत जेतेपदाच्या शर्यतीत

दुबई: player of the month awards अर्थात आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत 'प्लेअर ऑफ द इयर'ची घोषणा करत होते. आता त्यांनी 'प्लेअर ऑफ द मंथ' देण्याची घोषणा केली आहे. वाचा- आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट चाहते प्रत्येक महिन्याला ऑनलाइन मत देऊ या खेळाडूंची निवड करू शकतात. यासाठी आयसीसीने स्वतंत्र अकादमी केली आहे. यात माजी खेळाडू आणि पत्रकारांचा समावेश आहे. वाचा- आयीसीसच्या या पहिल्या महिन्यातील पुरस्कारांच्या नामांकनामध्ये भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद सिराज, फिरकीटपटू आर अश्विन आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा जलद गोलंदाज टी नटराजन देखील या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. वाचा- भारतीय खेळाडू वगळता इंग्लंडचा कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाज, दक्षिण आफ्रिकेचा मरिजाने काप आणि नादिन डे क्लार्क आणि पाकिस्तानचा निदा डार हे खेळाडू स्पर्धेत आहेत. वाचा- या पुरस्कारासाठी आयसीसी प्रत्येक विभागात तीन खेळाडूंचे नामांकन करेल. विजेत्या खेळाडूची घोषणा महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाणार आहे. एकूण मतांमध्ये या पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली अकादमीची मते ९० टक्के असतील. तर आसीसीच्या वेबसाइटचे नोंदणीकृत युझर्सची मते १० टक्के इतकी असतील. आयसीसीने हे पुरस्कार जाहीर केले असले तरी अनेक चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आयसीसीला ट्रोल केले आहे. आयसीसीकडून खेळाची प्रतिष्ठा कमी केली जात असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36nntV0

आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व, पाहा कोणी पटकावलं मानाचं स्थान

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपली क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. या क्रमवारीतील मानाचे स्थान भारतीय क्रिकेटपटूच्याच नावावर आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीतील मानाचे अव्वल स्थान भारताचा कर्णधार विराट कोहलीने पटकावले आहे. कोहलीने ८७० गुणांसह या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीतील दुसरे स्थानही भारताच्याच फलंदाजाच्या नावावर आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत दुसरे स्थान भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने पटकावले आहे. रोहित शर्माच्या नावावर ८४२ गुण जमा आहेत. त्यामुळे कोहलीनंतरचे दुसरे स्थान रोहितने मिळवले आहे. पण या दोघांचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला अव्वल १० फलंदाजांमध्ये स्थान पटकावता आलेले नाही. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी तिसरे स्थान पटकावलेले आहे. बुमराच्या खात्यामध्ये ७०० गुण जमा आहेत. या क्रमवारीत अव्वल स्थानावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. बोल्टच्या नावावर ७२२ गुण जमा आहेत. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत आयसीसी 'प्लेअर ऑफ द इयर'ची घोषणा करत होते. आता त्यांनी 'प्लेअर ऑफ द मंथ' देण्याची घोषणा केली आहे. आयीसीसच्या या पहिल्या महिन्यातील पुरस्कारांच्या नामांकनामध्ये भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद सिराज, फिरकीटपटू आर अश्विन आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा जलद गोलंदाज टी नटराजन देखील या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आयसीसीच्या या पुरस्कारासाठी प्रत्येक विभागात तीन खेळाडूंचे नामांकन करेल. विजेत्या खेळाडूची घोषणा महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाणार आहे. एकूण मतांमध्ये या पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली अकादमीची मते ९० टक्के असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cjUQvK

भारतीय क्रिकेटपटूने केला विवाह; संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती

नवी दिल्ली: Marriage भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू लग्नाच्या बंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरनसह सात फेरे घेतले. या दोघांनी आयपीएलच्या १३व्या हंगामाआधी साखरपुडा केला होता आणि सोशल मीडियावरून ही गुड न्यूज दिली होती. वाचा- विजय शंकरने २६ जानेवारी रोजी त्याचा ३०वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना ही लग्नाची बातमी दिली. आयपीएलमधील त्याचा संघ सनरायजर्स हैदराबादने त्याला शुभेच्छा दिल्या. वाचा- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूकडून २०२१ साली मिळालेली ही दुसरी गुड न्यूज आहे. याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. विजय शंकरच्या आयुष्यातील या नव्या डावासाठी संघातील अन्य खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, क्रुणाल पंड्या, करुण नायर, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल आणि अभिन मुकुंद यांनी शंकरला शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजय शंकरला स्थान मिळू शकले नव्हते. शंकरने २०१८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला होता. इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. तेव्हा शंकरला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याला फार खास कामगिरी करता आली नाही. दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. नंतर त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली गेली. वर्ल्डकपनंतर भारतीय संघात त्याला संधी मिळू शकले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L06el8

IND vs ENG : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणत्या ११ खेळाडूंना मिळाली संधी, गंभीरने केले स्पष्ट..

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण यावेळी भारताच्या कोणत्या ११ खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते, यासाठी भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने आपला खास संघ बनवला आहे. गंभीरने आपल्या संघात कोणत्या ११ खेळाडूंना संधी दिली आहे, पाहा... गंभीरने यावेळी आपला संघ निवडताना मयांक अगरवालऐवजी शुभमन गिलवर जास्त विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताच्या सलामीची धुरा गंभूरने गिलच्या हातामध्ये सोपवली आहे. गिलबरोबर यावेळी रोहित शर्मा सलामीला येईल, असे गंभीरने म्हटले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचा क्रमांक गंभीरच्या संघात आहे. गंभीरने यावेळी यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतवर विश्वास कायम दाखवला आहे. त्यामुळेच वृद्धिमान साहाचा विचार गंभीरने केला नसून यष्टीरक्षणाची जबाबदारी ही पंतवर सोपवली आहे. त्याचबरोबर गंभीरने यावेळी संघात तीन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. यामध्ये आर. अश्विनचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना न खेळणाऱ्या कुलदीप यादवलाही संघात स्थान दिले आहे. आतापर्यंत एकही कसोटी सामना चन खेळणारा अक्षर पटेलही यावेळी गंभीरच्या संघात पाहायला मिळत आहे. गंभीरने यावेळी आपल्या संघात दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. कारण भारतामध्ये वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा मिळत नाही. त्यामुळे गंभारने आपल्या या संघात जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ काल दाखल झाला. इंग्लंडच्या संघातील सर्व व्यक्तींची यावेळी करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतरच इंग्लंडच्या संघाला हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता सात दिवस इंग्लंडच्या संघाला क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला फक्त तीन दिवसच सराव करण्यासाठी मिळणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YzToNL

ऑस्ट्रेलियाला सुचले शहाणपण... 'भारतीय' क्रिकेटपटूला दिले संघात स्थान

सिडनी : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला शहाणपण सुचल्याचे सध्या म्हटले जात आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्यांनी चक्क भारतीय वंशाच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाच्या तनवीर संघाला स्थान देण्यात आले आहे. तनवीर हा जालंधरचा असल्याचे आता समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवणारा तनवीर हा भारतीय वंशाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या संघातून खेळताना तनवीरची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१५ साली गुरेंद्र संधूला संघात स्थान दिले होते आणि त्याला भारताविरुद्ध खेळवलेही होते. हा सामना मेलबर्न येथे झाला होता. संधू पंजाबी कुटुंबियातील आहे. संधूचे आई-वडिलांचा जन्म भारतामध्ये झाला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा तनवीर हा दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू ठरला आहे. जालंधरचा तनवीर हा बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर या संघाकडून खेळतो. आतापर्यंत या लीगमधील १४ सामन्यांमध्ये त्याने २१ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आली आहे. लहान असताना तनवीर हा वेगवान गोलंदाजी करायचा. पण कालांतराने त्याने वेगवान गोलंदाजी करणे सोडू दिले होते. त्यानंतर तनवीर हा फिरकी गोलंदाजी करायला लागला होता. सिडनी क्लबकडून खेळताना तनवीरने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते. पण याच खेळपट्ट्यांवर तनवीरने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आयसीसीच्या युवा विश्वचषकात तनवीर हा ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज म्हणून पुढे आला होता. कारण तनवीरने यावेळी दफक्त सहा सामन्यांमध्ये १५ विकेट्स मिळवल्या होत्या. एका सामन्यात तर तनवीरने फक्त १४ धावात देत पाच फलंदाजांना बादही केले होते. तनवीरच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत स्थान दिले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YpzCEc

फक्त एका फोटोमुळे शिखर धवनच्या अडचणी वाढल्या, कोर्टात याचिका दाखल...

नवी दिल्ली : फक्त एका फोटोमुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या एका फोटोमुळे धवनविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता धवनवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर शिखर धवनने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये धवन एका बोटीमध्ये बसला आहे. या बोटीमध्ये बसला असताना धवनच्या जवळ एक पक्षी आला आणि हा फोटो क्लिक करण्यात आला. हा फोटो धवनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यानंतर वाद-विवादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता धवनविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच धवनवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. देशभरात बर्ड-फ्ल्यू चे संकट आहे. यावेळी पक्षांच्या जवळ जाणे किंवा त्यांना दाणे टाकणे, यावर सरकारने प्रतिबंध आणला होता. पण धवनने हे नियम मोजले आहेत त्यामुळे आता धवनविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. धवनने एका पक्षाबरोबरचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता धवनला जो बोटचालक घेऊन गेला होता त्याच्यावर आता उत्तर प्रदेश सरकार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण देशभरात असे संकट असताना अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता धवनला जो बोटचालक नदीमध्ये घेऊन गेला होता त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्याचबरोबर आता धवनविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाराणसी येथील कोर्टात धवनविरुद्ध वकिल सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ६ फेब्रुवारीला होणार आहे. पण या सुनावणीपूर्वी धवनला घेऊन जाणाऱ्या बोटचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे. कारण या बोटचालकाने नवीन नियम धवनला सांगितले नसल्याची बाब आता पुढे आली आहे. त्यामुळे या बोटचालकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पण धवनबाबत कोर्टात नेमका काय निकाल लागतो, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2May8ve

IPL 2021: लिलावासाठी अर्जुन तेंडुलकर पात्र; या संघात मिळू शकते सचिनच्या मुलाला स्थान

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठीच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा ( ) अनेकदा आयपीएलमधील () संघाच्या सराव सत्रात दिसतो. अर्जुन मुंबईसाठी नेट गोलंदाज म्हणून असतो. भारतीय संघासाठी त्याने नेट गोलंदाजी केली आहे. आता मध्ये अर्जुन खेळताना दिसू शकतो. अर्जुनवर या वर्षी आयपीएलच्या लिलावात बोली लागू शकते. वाचा- अर्जुन तेंडुलकरने सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी मध्ये पदार्पण केले आणि त्याच बरोबर तो आयपीएलच्या लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र ठरला. ज्युनिअर तेंडुलकरने या वर्षी मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून दोन सामने खेळले आहेत. अर्जुनने खेळलेल्या दोन्ही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आणि अर्जुनला देखील फार खास कामगिरी करता आली नाही. असे असून देखील तो लिलावासाठी पात्र ठरला आहे. कारण तो सिनिअर संघाकडून खेळलाय. वाचा- बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या लिलावासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमानुसार अर्जुनने मुंबईकडून सामना खेळल्यामुळे तो लिलावासाठी पात्र ठरला आहे. आता अर्जुनला ऑनलाइन पद्धतीने लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करावी लागले. ज्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन औपचारिकता पूर्ण करेल. जर अर्जुनने लिलावासाठी उत्सुकता दाखवली तर मुंबई इंडियन्स त्याला विकत घेऊ शकतो. कारण गेली काही वर्ष तो मुंबईच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करत आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये अर्जुन मुंबईच्या खेळाडंसोबत दिसला होता. आयपीएल २०२१ साठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. यावर्षी मिनी लिलाव होणार आहे. तर २०२२च्या स्पर्धेआधी मेगा लिलाव होईल. तेव्हा सर्व संघांची पुन्हा एकदा बांधणी आहे. त्याच बरोबर आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cj9R0A

अजिंक्य तू खिलाडूवृत्ती दाखवलीस, मनापासून आभारी; ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची पोस्ट

नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. ब्रिस्बेन मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटीत भारताने ३ विकेटनी विजय मिळवाल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २-१ स्वत:कडे कायम राखली. स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना देखील भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. वाचा- तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारताच्या पराभवासाठी अखिलाडूवृत्ती दाखवली. पण भारतीय संघ आणि खेळाडूंनी मात्र त्याला उत्तर देण्याचे टाळले. चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू याला एक गिफ्ट दिले. त्याने भारतीय संघातील सर्व खेळाडूंची सही असलेली एक जर्सी लायनला भेट दिली. ब्रिस्बेन येथील कसोटी ही लायनचा १००वा कसोटी सामना होता. या जर्सीवर भारताच्या १६ खेळाडूंची स्वाक्षरी होती. वाचा- भारतीय संघाने दिलेल्या या खास भेटीबद्दल लायनने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघ आणि अजिंक्य रहाणेचे आभार मानले आहेत. लायनने या पोस्टमध्ये अजिंक्यला टॅग देखील केले आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्याबद्दल आणि भारतीय संघाचे अभिनंदन. अजिंक्य तु खिलाडूवृत्ती दाखवत जर्सी भेट दिली त्यासाठी आभारी, असे त्याने म्हटले आहे


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a8pw09

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ बुधवारी २७ जानेवारी रोजी चेन्नईत दाखल झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी बायो बबलमध्ये प्रवेश केला असून त्यांचा क्वारंटाइन कालावधी सुरू झालाय. वाचा- काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा विजय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणार आहे. या मालिकेसाठी खेळाडू क्वारंटाइन झाले आहेत. क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी मुली सोबत खेळताना दिसला. रहाणेचा हा व्हिडिओ त्याची पत्नी राधिकाने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा शेअर करताना क्वारंटाइनध्ये माझे मनोरंजन, असे राधिकाने म्हटलय. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य उपकर्णधाराच्या भूमिकेत आहे. या मालिकेत भाारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली पुन्हा संघात परतला आहे.ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर त्याने सुट्टी घेतली होती. भारतीय संघातील खेळाडू बुधवारपासून चेन्नईत दाखल होण्यास सुरूवात झाली. मोहम्मद सिराज आणि चेतेश्वर पुजार यांनी सोशल मीडियावरुन त्याची माहिती दिली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात हार्दिक पंड्या आणि जलद गोलंदाज इशांत शर्मा यांचा समावेश झाला आहे. दोन्ही संघातील चार पैकी पहिल्या दोन कसोटी चेन्नईत तर अखेरच्या दोन अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर खेळवल्या जाणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oub6fU

Wednesday, January 27, 2021

सौरव गांगुलीबाबत आली मोठी अपडेट, हॉस्पिटलने दिली ही महत्वाची माहिती

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबतची एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हॉस्पिटलने गांगुली यांच्याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी गांगुली यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कालपासून गांगुली यांना छातीत दुखात असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांच्यावर स्टेटिंग करावे लागणार असल्याचे हॉस्पिटलने यावेळी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत. त्यांचे सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले आहेत. स्टेटिंग म्हणजे नक्की असते तरी काय...काही वेळा ह्रदयाच्या धमन्यांमध्ये रक्त वाहण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अडचण येते. त्यावेळी या व्यक्तीला हार्ट अॅटॅकही येऊ शकतो. त्यावेळी तातडीने काही गोष्टी कराव्या लागतात. या परिस्थितीत बायपास सर्जरी करणेही अवघड होऊन बसते. या परिस्थिती स्टेटिंग हे त्या व्यक्तीसाठी वरदान ठरू शकते. स्टेटिंगच्या माध्यमातून धमन्यांमधील रक्ताचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होते. आज जेव्हा गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टर सप्तश्री बासु आणि सुरज मंडल यांनी त्यांचावर उपचार केले. त्याचबरोबर डॉक्टर आफताभ खाल आणि देवी शेट्टी यांच्या उपस्थितीत गांगुली यांच्यावर स्टेटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष गांगुली यांच्यावर होणाऱ्या स्टेटिंगवर असेल. गांगुली यांच्यावर यापूर्वी १ जानेवारीलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर गांगुली यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यावेळी गांगुली यांना तात्काळ वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांमध्ये गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ooGuMW

इंग्लंविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पाठवली कायदेशीर नोटीस

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. पण त्यापूर्वीच कोहलीला एक मोठा धक्का बसला आहे. कोहलीला केरळच्या उच्च न्यायालयाने एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. आता कोहलीला या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे. कोहलीचे बरेच चाहते आहेत. पण कोहली एका ऑनलाइन रमी गेमचा सदिच्छादूत आहे. या गेमचे व्यसन तरुण पिढीला लागलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळे या गेमविरोधात आणि त्याचे प्रमोशन करणाऱ्या व्यक्तींविरोधात केरळ उच्च न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. केरळ उच्च न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली असून आता विराट कोहलीसह अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता अजू वर्गीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. युवा पिढी ही भारतातील सेलिब्रेटींची चाहती असते. ते ज्या गोष्टी सार्वजनिकपणे दाखवतात, त्या गोष्टी युवा पिढी करण्याचा प्रयत्न करत असते. या गेमममध्ये युवा पिढीतील बऱ्याच जणांनी पैसे गमावले आहेत, तर काही जणांवर जीव गमावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे हा गेम थांबवण्यात यावा, याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या पाऊली वडक्कन यांनी याबाबत केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की," या ऑनलाईन गेमममध्ये देशातील बऱ्याच लोकांनी पैसे गमावले आहेत, त्याचबरोबर काही जणांचा यामुळे जीवही गेला आहे. २७ वर्षीय विनित या युवकाने या गेमममध्ये तब्बल २१ लाख रुपये गमावले, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे हा गेम बंद करण्यात यावा, अशी याचिका मी उच्च न्यायालयात केली होती." या ऑनलाइन गेममध्ये ३२ वर्षीय सजेश यानेही मोठी रक्कम गमावली आहे. याबाबत सजेश म्हणाला की, " याप्रकरणी उच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेत योग्य आहे आणि मी या निर्णयाचे स्वागत करतो. कारण मी अशा बऱ्याच व्यक्तींना ओळखतो की, ज्यांनी या गेममध्ये मोठी रक्कम गमावली आहे. मी स्वत: या ऑनलाइन गेममध्ये सहा लाख रुपये हरलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची घेतलेली दखल योग्यच आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aaET8e

निवृत्तीनंतरही महेंद्रसिंग धोनीची जादू कायम, मिळवून दाखवला एकहाती विजय...

मुंबई : महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. पण तरीही धोनीची जादू अजूनही संपलेली पाहायला मिळत नाही. कारण आंतरराष्ट्रीय परिषदेनेही निवृत्तीनंतर धोनीची दखल घेतली असून त्याला आता मानाचे पान मिळाले आहे. धोनी हा आपल्या कुशल नेतृत्वामुळे क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होता. पण निवृत्तीनंतरही चाहते धोनीला अजूनही विसरु शकलेले नाहीत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि आयसीसीनेदेखील धोनीचा यावेळी सन्मान केल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर काल एक प्रश्न विचारला होता आणि चाहत्यांकडून याबाबत आपली मते मागवली होती. यामध्ये आयसीसीने विचारले होते की, " क्रिकेट विश्वातील सर्वात शांत खेळाडू तुम्हाला कोण वाटतो?" यासाठी आयसीसीने चार पर्यायही दिले होते. यामध्ये धोनीसह केन विल्यम्सन, मिसबाह उल हक आणि स्टीव्ह वॉ असे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर चाहत्यांनी तब्बल ७१.५ टक्के मतं ही धोनीला दिली आहेत. त्यामुळे धोनी यामध्ये एकहाती विजयी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीनंतर सर्वाधिक मतं ही केनला मिळाली. केनला यावेळी १६.८ टक्के एवढी मतं मिळाली, पण ही मतांची टक्केवारी धोनीपेक्षा तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे या स्पर्धेत धोनीने एकहाती विजय मिळवला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चाहते अजूनही धोनीवर तितकेच प्रेम करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे धोनीची क्रिकेट चाहत्यांवरील जादू अजूनही संपलेली नाही. धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनी क्रिकेट विश्वात जसा आपल्या नेतृत्वामुळे प्रसिद्ध आहे, तसाच तो आपल्या नवीन लुकसाठीही असतो. गेल्या वर्षभारता धोनीचे बरेच लुक पाहायला मिळाले. पण धोनीचा सध्याचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच धोनीच्या नव्या लुकचे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या नवीन लुकमध्ये धोनी अजून तरुण दिसत आहे. अशी प्रतिक्रीया काही चाहत्यांनीही दिली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mt6N7g

IND vs ENG : इंग्लंडच्या संघाचे भारतामध्ये असे झाले स्वागत, व्हिडीओ झाला व्हायरल...

चेन्नई, : भारतीय संघाबरोबर दोन हात करण्यासाठी इंग्लंडचा संघ आज भारतामध्ये दाखल झाला. सध्याच्या घडीला करोनाच्या काळातही इंग्लंडच्या संघाचे भारतामध्ये कसे स्वागत करण्यात आले, याबाबतचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी श्रीलंकेला कसोटी मालिकेत २-० असे पराभूत केले होते, हे भारतीय चाहत्यांना विसरून चालणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ चेन्नईला पोहोचला आहे. पण चेन्नईला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी इंग्लंडचा संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट म्हणजे करोना चाचणी. भारताच्या संघातील खेळाडूंनाही करोना चाचणी केल्याशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. करोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येणार आहे. भारतीय संघालाही हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी करोना चाचणी करावी लागणार आहे. ज्या खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह येईल त्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या सर्व गोष्टींनंतर भारतीय संघ सराव करु शकतो. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना कसोटी मालिका खेळण्यासाठी या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना भारतामध्ये कमी दिवस सराव करायला मिळणार आहे. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी शानदार अशी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. त्याच टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sXyea6

IND vs AUS : भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेची चौकशी झाली, ही गोष्ट समोर आली

ब्रिस्बेन, : भारतीय खेळाडूंवर सिडनी आणि ब्रिस्बेन येथील मैदानात प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केली होती. या प्रकरणाची चौकशी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत होती. ही चौकशी आता पूर्ण झाली असल्याचे समजते आहे. या चौकशीमधून बऱ्याच गोष्टी आता समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याप्रकरणी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने मैदानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंवर कीती जणं वर्षद्वेषी टीका करत होते, हेदेखील यामध्ये आता समोर आलेले आहे. यामध्ये दोषी ठरलेल्या प्रेक्षकांना न्यू साऊथ वेल्स येथील पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. काही दिवसांतच न्यू साऊथ वेल्स येथील पोलिस आपला अहवाल सादर करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष सीन कॅरोल यांनी यावेळी सांगितले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघातील खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ चौकशीनंतर स्पष्ट करु इच्छिते की, सिडनीमध्ये भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. आता या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने अजून काही गोष्टींची चौकशी करण्याचे ठरवले आहे." सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांना प्रेक्षकांनी शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर यावेळी त्यांच्यावर वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघाने याबाबतची तक्रार मैदानातील पंचांकडे केली होती. त्यावेळी मैदानातील पंचांनी भारतीय संघाला मैदान सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. पण यावेळी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ही गोष्ट मान्य केली नव्हती. क्रिकेट या खेळाचा आम्ही सन्मान करतो आणि त्यामुळे आम्ही मैदान सोडून जाणा नाही, अशी भूमिका यावेळी अजिंक्यने घेतलेली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर आयसीसीदेखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या प्रेक्षकांवर आता कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेल आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cg4RtO

सौरव गांगुली यांना एकाच महिन्यात दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांना आज तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण या एकाच महिन्यात गांगुली यांना दुसऱ्यांदा हॉस्पिटलची पायरी चढावी लागली आहे. महिन्याभरात गांगुली यांना नेमकं काय झालं आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती... गांगुली यांना काल अस्वस्थ वाटू लागले होते, त्याचबरोबर त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे आज सोमवारी त्यांना तातडीने कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. गांगुली यांच्यावर यापूर्वी १ जानेवारीलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. त्यावेळी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यानंतर मात्र गांगुली यांच्या तब्येतीमध्ये काही काळ सुधारणार दिसली होती. पण त्यानंतर काही दिवसांतच गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर गांगुली यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यावेळी गांगुली यांना तात्काळ वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांमध्ये गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डीस्चार्जही दिला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. वुडलँड्स हॉस्पिटलमधून घरी आल्यावर गांगुली काही दिवसांनंतर पूर्णपणे फिट असल्याचे दिसत होते. बीसीसीआय आणि आयपीएलच्या काही बैठकांमध्येही त्यांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. पण पुन्हा एकदा २७ जानेवारीला गांगुली यांच्या छातीत पुन्हा दुखायला लागले आणि त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गांगुली यांना नेमके काय झाले आहे, याचे निदान अद्याप झालेले नाही. पण त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मात्र सुरु करण्यात आले आहेत. काही वेळात अपोलो हॉस्पिटलमधून मेडिकल बुलेटिन सादर करण्यात येईल आणि त्यानंतरच गांगुली यांना यावेळी नेमकं काय झालं आहे, हे सर्वांना समजू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NAmB8J

BREAKING NEWS... सौरव गांगुली पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. काल रात्री गांगुली यांना अस्वस्थ वाटत होते, त्याचबरोबर त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे आज अखेर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामधून ते बरे झाले होते. पण आता पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच दुसऱ्यांदा गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. यापूर्वी, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गांगुली यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. गांगुली यांना यापूर्वी जेव्हा डिस्चार्ज देण्यात आला होता तेव्हा रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने एका मित्र जॉयदीपसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत तो म्हणतो, तु माझ्यासाठी जे केले आहेस. ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. गेल्या पाच दिवसांपासून तू माझ्यासाठी जे केले आहेस. ती अशी गोष्ट आहे जी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी तुला गेली ४० वर्ष ओळखतोय आणि ही गोष्ट माझ्यासाठी कुटुंबापेक्षा महत्त्वाची आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36y24IT

आयपीएलच्या लिलावाची तारीख ठरली, पाहा कधी, कुठे आणि कोणत्या खेळाडूंचा होणार लिलाव...

नवी दिल्ली : यावर्षीचा आयपीएलचा लिलाव नेमका कुठे आणि कधी होणार याबाबत बीसीसीआयने आता अधिकृत माहिती दिलेली आहे. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलच्या कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील, हे स्पष्ट होऊ शकेल. यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावात बरेच नामांकित खेळाडू उपलब्ध होणार आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्ससारख्या संघांनी बऱ्याच नामांकित खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर लिलावात किती बोली लागते आणि ते कोणत्या संघात जातात, याचे चित्र १८ फेबुवारीला स्पष्ट होऊ शकते. सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय, केदार जाधव, मोनू सिंग या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये बरेच नामांकित खेळाडू पाहायला मिळतील. पण या नामांकित खेळाडूंना नेमक्या कोणत्या संघात स्थान मिळते, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. गेल्यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण यावर्षी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. यावर्षी आयपीएल एप्रिल महिन्यात होऊ शकते, असे समजते आहे. त्यामुळे त्यापूर्वी आयपीएलचा लिलाव होणार आहे. या लिलावात कोणते संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतात, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आयपीएलच्या लिलावाकडे लागलेले आहे. त्यामुळे आता १८ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3abPEHD

Tuesday, January 26, 2021

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर दान करतो क्रिकेट किट, हे आहे त्यामागचं खरं कारण

नवी दिल्ली : भारताच्या रिषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये सिद्ध करुन दाखवले की, त्याची कारकिर्द अजून संपलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पंतने नाबाद राहत अविस्मरणीय खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण आता पंतबाबतची एक खास गोष्ट आता सर्वांसमोर आली आहे. पंत हा प्रत्येक मालिकेनंतर आपली क्रिकेट किट दान करत असल्याचे आता समोर आले आहे. पण त्याचबरोबर पंत ही गोष्ट का करतो, याचे कारणही आता समजले आहे. पंत हा आक्रमक फलंदाज असला तरी तो खासगी आयुष्यात तेवढाच भावुक असल्याचे आता समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. कारण पंतने पाच डावांमध्ये २७४ धावा बनवल्या होत्या. त्याचबरोबर या दौऱ्यात ९७ धावांची सर्वोत्तम खेळी त्याने साकारली होती. ब्रिस्बेन कसोटीत त्याची ८९ धावांची खेळी कोणीही विसरु शकणार नाही. त्याचबरोबर या दौऱ्यात पंतच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. पंत हा प्रत्येक मालिकेनंतर आपील किट बॅग दान करतो. बीसीसीआयकडून वार्षिक करार मिळाल्यानंतर पंत ही गोष्ट करत असल्याचे आता समोर आले आहे. याबाबत एका मुलाखतीमध्ये पंतला याबाबत विचारले होते. त्यावेळी पंतने सांगितले की, " जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे तारक सर मला फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचे साहित्य द्यायचे. त्याचबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी शुजही तेच मला द्यायचे. भारताचे माजी गोलंदाज आशिष नेहराही त्यावेळी क्लबमध्ये अशी बरीच मदत करायचे. या सर्व गोष्टींमुळे माझी कारकिर्द घडण्यात मोलाचा हातभार लागला. लहान असताना मलाच बऱ्याच लोकांनी असे सामना दिले होते. त्यामुळे आता मी अशा परिस्थितीत आहे की, मीदेखील अन्य होतकरु क्रिकेटपटूंना मदत करु शकतो. त्यामुळेच आता ही गोष्ट युवा आणि गरजू क्रिकेटपटूंसाठी करायचे मी ठरवले आहे." भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ उद्या चेन्नईला पोहोचणार आहे. पण चेन्नईला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारतीय संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट म्हणजे करोना चाचणी. भारतीय संघातील खेळाडूंना करोना चाचणी केल्याशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंची टेस्ट निगेटीव्ह आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36w2KOX

IND vs ENG : भारतीय संघाला चेन्नईच्या हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी करावी लागणार ही महत्वाची गोष्ट

नवी दिल्ली, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ चेन्नईसाठी २७ जानेवारीला रवाना होणार आहे. पण यावेळी चेन्नईच्या हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ उद्या चेन्नईला पोहोचणार आहे. पण चेन्नईला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारतीय संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट म्हणजे करोना चाचणी. भारतीय संघातील खेळाडूंना करोना चाचणी केल्याशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारतीय संघाला करोना चाचणी करावी लागणार आहे. ज्या खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह येईल त्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या सर्व गोष्टींनंतर भारतीय संघ सराव करु शकतो. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना कसोटी मालिका खेळण्यासाठी या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी शानदार अशी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. त्याच टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. कुलदीपने गेल्या दोन वर्षात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत अ संघाविरुद्धच्या सामन्यात १६ ओव्हरमध्ये त्याने एकही विकेट घेतली नव्हती. त्यामुळेच कुलदीपच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली कामगिरी केली होती. चेन्नई हे सुंदर आणि अश्विनचे घरचे मैदान आहे. याचा फायदा घेण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36eWkn1

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...