Ads

Thursday, February 4, 2021

IND vs ENG : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचीही झाली टीम इंडियाच्या बैठकीत चर्चा, पाहा नेमकं काय घडलं...

चेन्नई, : सध्याच्या घडीला भारतामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच महत्वाच्या मुद्द्याची चर्चा ही भारतीय संघाच्या बैठकीतही झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापर्वी आज भारतीय संघाची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चाही झाली. याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, " फक्त क्रिकेट नाही तर अन्य बऱ्याच गोष्टींची चर्चा भारतीय संघाच्या बैठकीमध्ये होत असते. यावेळीही भारतीय संघाच्या बैठकीत आम्ही सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या गोष्टीची चर्चा केली. यामध्ये क्रिकेटपटूंनी आपली मतं व्यक्त केली. भारतीय संघाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच आम्ही या विषयावर चर्चा केली आणि त्यांनतर आम्ही क्रिकेट मालिकेबाबत संवाद साधला." शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनीही आपले मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याबाबत एक ट्विट काल केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आज भारताच्या क्रिकेटपटूंनी या आंदोलनाबाबत आपली मतं व्यक्त केली होती. शेतकऱ्यांच्या आंदोनलाबाबत बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विट केल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेटपटू शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नेमकं काय म्हणाले, पाहा... सचिन तेंडुलकरभारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. विराट कोहलीसध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंगभारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेजर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pQ3x4P

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...