चेन्नई: for भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत या सामन्यात दोन जलद गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंना संधीत देऊ शकते. वाचा- भारत दोन जलद गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता असल्याने संघात जसप्रीत बुमराहसोबत इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेपॉक मैदानावर नेहमी फिरकीपटूंना मदत मिळते. त्यामुळे दुसरा जलद गोलंदाज म्हणून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोणाला संधी देतात हे पाहावे लागले. वाचा- इशांत शर्माने गेल्या एका वर्षापासून लाल चेंडूने क्रिकेट खेळला नाही. या उलट सिराजने ऑस्ट्रेलिया धमाकेदार कामगिरी केली होती. ब्रिस्बेन कसोटीच्या एका डावात त्याने पाच विकेटसह मालिकेत १३ विकेट घेतल्या होत्या. इशांतने नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत १४.१ ओव्हर गोलंदाजी केली होती. वाचा- येत्या दोन दिवसात गोलंदाजीचे प्रशिक्षक इशांत किंवा सिराज यांच्यापैकी एकाला घेण्याबाबत निर्णय घेतील. दुसरा निर्णय फिरकीपटूंच्या बाबतचा असले. आर अश्विनसोबत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यापैकी कोणाची निवड केली जाते हे पाहावे लागले. वाचा- सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत पदार्पण करताना अर्धशतक आणि चार विकेट घेतल्या होत्या. पण सुंदरचा समावेश केलास संघात असे दोन फिरकीपटू असतील ज्यांच्याकडे कमी अनुभव असेल. हार्दिक पंड्या हा आणखी एक पर्याय भारताकडे आहे. तो बुधवारी सकाळी क्वारटाइनचा कालावधी पूर्ण करून सराव सत्रात सहभागी झाला. पंड्या वैयक्तीक कारणामुळे उशीरा चेन्नईत दाखल झाला होता. पंड्याला संधी मिळो की नाही. पण त्याच्यावर गोलंदाजी करण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे. पहिल्या कसोटीसाठी संभाव्य संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर/अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा/ मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ri7mzT
No comments:
Post a Comment