
चेन्नई, : क्रिकेट या खेळात फक्त हार-जीत महत्वाची नसते तर त्यामध्ये खेळभावनेला सर्वात जास्त महत्व द्यायला हवं. या गोष्टीचा उत्तम वस्तुपाठ भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. कारण शतक झळकावल्यावर जेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुटला जेव्हा दुखापत झाली तेव्हा त्याच्या मदतीसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली धावून गेल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं तरी काय... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने यावेळी शतक झळकावले. पण या सामन्यामध्ये रुटच्या पायात गोळे आले होते आणि त्याला चालताही येत नव्हते. त्यावेळी रुट हा मैदानात पाठ टेकून खाली झोपला होता. त्यावेळी इंग्लंडचे डॉक्टरही मैदानात आले नव्हते. पण डॉक्टर येण्यापूर्वीच भारताच कर्णधार कोहली त्याच्या मदतीसाठी धावून गेला. कोहलीने यावेळी रुटचे दोन्ही पाय उचलले आणि त्याच्या पायातील गोळे जाण्यासाठी उपचार केले. त्यामुळे क्रिकेट हा कसा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जो रुटने शंभराव्या कसोटी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. पण यावेळी रुटने अशी एक गोष्ट केली की ती आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. आपल्या ९८, ९९ आणि १००व्या कसोटीत शतक करणारा जो रूट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील दोन्ही सामन्यांमध्ये रुटने शतक झळकावलेले होते. हे रुटचे अनुक्रमे ९८ आणि ९९ वे सामने होते. भारताविरुद्धच्या शंभराव्या सामन्यातही रुटने दमदार शतक झळकावत क्रिकेटमधील अनोखा विश्वविक्रम रचला आहे. त्याबरोबर रुटचे भारताबरोबर चांगले कनेक्शन असल्याचेही आता पुढे आले आहे. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rqaA4m
No comments:
Post a Comment