
चेन्नई, : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच यष्टीरक्षण करत असताना आपल्या गोलंदाजांना मार्गदर्शन करायचा. धोनीचीच नक्कल यावेळी भारताया युवा यष्टीरक्षक रिषभ पंतही करताना दिसला. भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला यावेळी पंत काही टिप्स देताना दिसला. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विन भेदक मारा करत होता. इंग्लंडचे फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीवर सावधानीने खेळत होते. त्यावेळी नेमका कुठे चेंडू टाकला की, हा फलंदाज आऊट होऊ शकतो, याचे मार्गदर्शन यावेळी पंत देत असल्याचे पाहायला मिळत होते. स्टम्पजवळ असलेल्या माइकमध्ये पंतच्या या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या असून ते ऐकण्याचा आनंद चाहत्यांनी यावेळी लुटल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतने झेल सोडला. यामुळे भारतामध्ये पहिलीच कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराचे पहिल्यात चेंडूवर विकेट मिळवण्याचे स्वप्न भंग पावले. बुमराने आपला पहिलाच चेंडू लेग स्टम्पच्या दिशेने टाकला होता. हा चेंडू लेग साईडला मारण्याचा इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स प्रयत्न करत होता. पण यावेळी रॉरीच्या बॅटची कडा चेंडूने घेतली. हा चेंडू यष्टीरक्षक पंतच्या दिशेने जात होता. पंतने यावेळी आपल्या उजव्या बाजूला सूर मारुन हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. पण पंतला हा झेल काही टिपता आला नाही. पंतने जेव्हा रॉरीला जीवदान दिले तेव्हा तो फक्त एका धावेवर होता. पण त्यानंतर रॉरीने ३३ धावांची खेळी साकारली. पण त्यानंतर बुमराने इंग्लंडच्या डॅन लॉरेन्सला शून्यावर बाद केले आणि भारतामधील पहिल्या कसोटी सामन्यात बळी मिळवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rrg2UQ
No comments:
Post a Comment