
नवी दिल्ली: qualification भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेवर फक्त भारत आणि इंग्लंड नव्हे तर अन्य दोन देशांचे लक्ष लागले आहे. यातील पहिला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया होय आणि दुसरा संघ म्हणजे न्यूझीलंड होय. वाचा- येत्या जून महिन्यात लॉर्डस मैदानावर आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. यासाठी न्यूझीलंडचा संघ पात्र ठरला असून आता दुसऱ्या संघासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. वाचा- भारतीय संघाला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत किमान २-० किंवा २-१ किंवा ३-० किंवा ३-१ किंवा ४-० असा विजय मिळवावा लागले. वाचा- जर इंग्लंडला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना भारतावर ३-० किंवा ३-१ किंवा ४-० असा विजय मिळवावा लागले. या उटल ऑस्ट्रेलियाचे फायनलचे तिकिट या दोन्ही संघांच्या मालिकेच्या निकालावर अवलंबून आहे. भारताने इंग्लंडचा १-० किंवा इंग्लंडने भारताचा १-०, २-० किंवा २-१ असा पराभव केला तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचू शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका ०-०, १-१ किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तरी ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचू शकेल. भारताची सध्या जिंकण्याची टक्केवारी ही ७१.७ टक्के आहे, तर ऑस्ट्रेलियाची ६९.२ टक्के आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oLzM3K
No comments:
Post a Comment