नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळू शकते. या दोन्ही संघातील अखेरच्या लढती जगातील सर्वात क्रिकेट मैदान असलेल्या मोटेरा अर्थात सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर होणार आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे भारतात आंतरराष्ट्रीय सामने झाले नाहीत. आता एका वर्षांनी होणाऱ्या सामन्यासाठी कदाचित प्रथमच प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश मिळू शकतो. दोन्ही संघात ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. या सामन्यात आधी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल असे वृत्त होते. पण करोना परिस्थितीमुळे प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने , भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांना आमंत्रण पाठवले आहे. त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्री जे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते देखील हा सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन लढतीनंतर याच मैदानावर टी-२० लढती देखील होणार आहेत. वाचा- बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानाची क्षमता एक लाखापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. सरकारने ५० टक्के प्रेक्षकांना बोलवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. या सामन्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील प्रवेश दिला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी अमेरिकेचे तकालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह या मैदानाचे उदघाटन केले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YxoxBf
No comments:
Post a Comment