चेन्नई, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चाहत्यांना चेन्नईतील दोन्ही कसोटी सामने आता लाइव्ह पाहाता येणार आहेत. करोनानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना हे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहेत. तामिळनाडूच्या सरकारने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तामिळनाडू सरकारने स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे मान्य केले आहे. सरकारच्या नियमानुसार आता स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेएवढे प्रेक्षक आता कसोटी सामना पाहू शकतात. त्यामुळे आता चेन्नईतील दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भारतातील सामने प्रेक्षकांना पाहता यावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत होती. बीसीसीआयच्या प्रयत्नांना आता यश आल्याचे पाहायला मिळत आहे. भारत-इंग्लंड मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठींही प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकतो, अशी शक्यता आहे. याबाबत गुजरात सरकार विचार करत असून लवकरच याबाबतची घोषणाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतातील सर्व क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना उपस्थिती लावता येईल, असे चित्र आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता आपल्याच मैदानात इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. पण यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंककडे नसून ते विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या मालिकेत अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. त्यामुळे या मालिकेत कोहलीची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ०-१ अशा पिछाडीवरुन २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा अविस्मरणीय विजय मिळवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे यावेळी कौतुक केले आहे. भारतीय संघाचा हा विजय प्रेरणादायी होता, असे मोदी यांनी म्हटेल आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cvH610
No comments:
Post a Comment