
मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्माने काल एक ट्विट केले होते. रोहितच्या या ट्विटला बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले होते. पण हे ट्विट आक्षेपार्ह असल्यामुळे ते डिलीट करावे लागले. कंगनाचे ट्विट डिलीट झाल्यावर तिला चाहत्यांनी चांगलेच झापल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी यावेळी रोहितचे भारतासाठीचे योगदान दाखवून दिले आहे आणि त्याचा अपमान करण्याची तुझी पात्रता आहे का, असा सवालही यावेळी विचारला आहे. रोहितने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं...आपल्या ट्विटमध्ये रोहित शर्मा म्हणाला होता की, "जेव्हाही आपण एकत्र उभं राहिलो आहे, तेव्हा तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्व एकत्र येऊन काही तरी उपाय नक्कीच काढू'." कंगनाने या ट्विटवर नेमकं काय म्हटलं होतं, पाहा...रोहितच्या ट्विटवर कंगना म्हणाली की, "क्रिकेटपटूंची अवस्था अशी का झाली आहे, 'ना घर का ना घाट का'. शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतिकारी ठरणार आहे. हे दहशदवादी आहेत, जे गोधंळ घालतायत. असं बोलायला भीती का वाटतेय?" चाहत्यांनी या सर्व प्रकारानंतर कंगनाला चांगलेच ट्रोल केले आहे. रोहितने आतापर्यंत भारतासाठी किती धावा केल्या आहेत, किती विक्रम केले आहेत, हे त्यांनी कंगनाला सांगितले आहे. त्याचबरोबर रोहितच्या योगदानाच्या एक टक्काही काम कंगनाला करता आलेले नाही, असे चाहत्यांनी यावेळी म्हटलेले आहे. कंगनाने क्रिकेटपटूंना धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का... असे म्हटले होते. त्यानंतर कंगनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे हे वादग्रस्त ट्विट डिलीट करावे लागले. त्यानंतर कंगनावर चाहत्यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कंगना या विषयावर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36GoU0M
No comments:
Post a Comment