
मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा () मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करतो. काही दिवसांपूर्वी अर्जुन सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत खेळला होता. आता अर्जुनला आणखी एक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे. बीसीसीआयकडून आयोजित स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. वाचा- बीसीसीआय ( )ने या वर्षी मुश्ताक अली ट्रॉफीनंतर रणजी स्पर्धेच्या ऐवजी विजय हजारे ट्रॉफी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेसाठी मुंबई संघाने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत अर्जुनचा देखील समावेश आहे. अर्थात मुंबईने १०४ जणांची यादी जाहीर केली आहे. इतक्या खेळाडूमधून अर्जुनची अंतिम संघात निवड होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- या संभाव्य खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचा देखील समावेश आहे. पण पृथ्वी सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्याला धावा करता आल्या नाहीत. पहिल्या दोन डावात शून्यावर बाद झाल्यानंतर अन्य तीन सामन्यात पृथ्वीला संधी दिली गेली नाही. वाचा- अर्जुनने या वर्षी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध सामने खेळले होते. अर्जुन जलद गोलंदाज आहे आणि त्याने भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत अर्जुनने दोन सामन्यात ६७ धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. वाचा- मुंबईच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, अरमान जाफर, आदित्य तारे, सिद्धेष लाड यांचा समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oCfBoV
No comments:
Post a Comment