
चेन्नई, : इंग्लडविरुद्ध दोन हात करण्यासाठी भारतीय संघ चेन्नईच्या मैदानात घाम गाळत आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकल्यावरही भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो, असे सध्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला चांगलाच फायदा झाला आहे. कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताला जर या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना इंग्लंडवर फक्त विजय मिळवून चालणार नाही. जाणून घ्या काय आहे समीकरण... न्यूझीलंडच्या संघाकडे सध्या ४२० गुण आहे आणि त्यांची जिंकण्याची टक्केवारी ही ७० टक्के आहे. यानंतर न्यूझीलंड एकही कसोटी मालिका खेळणार नाही. त्यामुळे आता न्यूझीलंड या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी आता तीन संघांमध्ये शर्यत आहे. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. भारताची सध्या जिंकण्याची टक्केवारी ही ७१.७ टक्के आहे, तर ऑस्ट्रेलियाची ६९.२ टक्के आहे. भारताची इंग्लंडबरोबरची मालिका बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलिया या फानलमध्ये जाऊ शकते आणि भारताचा पत्ता कट होऊ शकतो. त्याचबरोबर भारताने १-० अशी जरी ही मालिका जिंकली तरी त्यांना फायनलमध्ये पोहोचता येणार नाही. भारताने जर ही मालिका २-१ अशी जिंकली तर त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. पण जर इंग्लंडला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना भारताला ३-०, ३-१ किंवा ४-० अशा फरकाने पराभूत करावे लागणार आहे. गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये इंग्लंडने सातत्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका कोण जिंकतो यापेक्षा किती फरकाने जिंकली जाते, यावर फायनलचे गणित अवलंबून असेल. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी १८ जुनला खेळवण्यात येणार आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचे स्थान निश्चित झाले आहे. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या निकालावर अंतिम फेरीत दुसरा कोणता संघ खेळू शकतो, हे ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष हे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36yqCkK
No comments:
Post a Comment