नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्धात आयसीसीने दशकातील सर्वोत्तम वनडे, टी-२० आणि कसोटी संघांची घोषणा केली. त्याच बरोबर सर्वोत्तम खेळाडू देखील निवडण्यात आले. या निवडीमध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश होता. कसोटीचे नेतृत्व विराट कोहलीकडे तर वनडे आणि टी-२०चे कर्णधारपद एमएस धोनीला देण्यात आले. या शिवाय इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला कसोटी आणि वनडे संघात स्थान दिले गेले आहे. वाचा- स्टोक्स हा काही मोजक्या खेळाडूंपैकी आहे ज्याला दोन्ही संघात स्थान मिळाले. पण आयसीसीचा हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्टोक्स नाराज झालाय. ज्या खेळाडूंची आयसीसीच्या संघात निवड झाली आहे त्यांना खास टोपी मिळाली आहे. या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले केले गेले. स्टोक्सला वनडे संघाची टोपी आवडली पण कसोटी संघासाठी देण्यात आलेली टोपी काही आवडली नाही. यावर त्याने सोशल मीडियातून जाहीर पणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयसीसीने sorry म्हणून त्याची माफी मागितली. वाचा- स्टोक्सने दोन टोपी घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या दोन्ही टोपी घातल्याने मला गर्व वाटतोय असे त्याने म्हटले आहे. पण यातील एक टोपी मला योग्य वाटत नाही. धन्यवाद !, असे त्याने म्हटले आहे. वाचा- आयसीसीने स्टोक्सच्या या फोटोवर उत्तर म्हणून सोशल मीडियावर पटकन माफी मागून टाकली. स्टोक्सने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. स्टोक्सने ज्या मजेदार पद्धतीने उत्तर दिले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o8ENDO