नवी दिल्ली: Budget 2021केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन () यांनी आज सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी करोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेसाठीच्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आपल्या भाषणात सीतारामन यांनी भारतीय क्रिकेट संघाने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयाचा उल्लेख केला. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत २-१ने विजय मिळवला. या विजयाबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. अशातच देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सीतारामन यांनी देखील भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले. भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या, यावरून लक्षात येते की आमच्याकडे किती गुणवत्ता आहे. जे मागच्या क्रमांकावर होते त्यांनी पुढे येऊन कामगिरी बजावली. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात विजय मिळवला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतला होता. त्यानंतर मालिकेत १-०ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने मेलबर्नमध्ये विजय मिळवत बरोबरी केली. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना देखील भारताने मिळवलेल्या या विजयाचे कौतुक अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आले. वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात या कार्यक्रमातून भारतीय संघाच्या विजयाचा उल्लेख केला होता. PM मोदींनी केलेल्या या कौतुकाबद्दल याने सोशल मीडियावरून त्यांचे आभार मानले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pCX3Gk
No comments:
Post a Comment