
नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात अनेक नव्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. या दौऱ्यात तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या ()ने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यॉर्करच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरणाऱ्या या गोलंदाजाने मायदेशात परतल्यावर देवाचे आभार मानले. वाचा- टी नटराजनने तामिळनाडूतील पळनी मुरुगन मंदिरात जाऊन त्याचे केस अर्पण केले. या मंदिराला भेट दिल्यानंतर नटराजनने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत त्याने केस कापल्याचे दिसते. फोटो शेअर करताना Feeling blessed असे म्हटले आहे. वाचा- नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केले होते. या पहिल्याच सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर टी-२० मालिकेत त्याने ३ सामन्यात ६ विकेट घेतल्या. तर अखेरच्या कसोटीत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. ब्रिस्बेन कसोटीत नटराजनने शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या होत्या. वाचा- मायदेशात आल्यावर सालेममध्ये त्याला रथामध्ये बसवण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नटराजनने केस कापल्याचा फोटो शेअर केल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आठवण आली. भारतीय संघाने जेव्हा २०११ साली आयसीसी वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा धोनीने केस कापले होते. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rhnKkp
No comments:
Post a Comment