Ads

Monday, February 1, 2021

कोलकाता ते कानपूर व्हाया मद्रास; ३६ वर्षे झाली भारतीय खेळाडूचा विक्रम कोणी मोडू शकले नाही

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार ( )च्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अझरचा हा विक्रम आजपर्यंत कोणाला मोडता आला नाही. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. अझरच्या त्या विक्रमाला आज ३६ वर्ष झाली आहेत. वाचा- मोहम्मद अझरूद्दीने ३६ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत खळबळ उडवली होती. मनगटाने शानदार फटकेबाजी करणाऱ्या अझरला वंडर बॉय म्हणून ओळखले जायचे. अझरने फक्त पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले नव्हेत तर पहिल्या तिनही कसोटीत शतक करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली होती. अझरचा हा विक्रम १ फेब्रुवारी १९८५ रोजी झाला होता, जो आजपर्यंत कायम आहे. वाचा- अझरने ३१ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत ११० धावा केल्या होत्या. पदार्पणात शतक करून अझर थांबला नाही. तर त्यानंतर चेन्नईत (मद्रास) झालेल्या दुसऱ्या कसोटीत ४८ आणि १०५ धावा केल्या. तर मालिकेतील अखेरच्या कसोटीत (कानपूर) त्याने पहिल्या डावात १२२ तर दुसऱ्या डावात नाबाद ५४ धावा केल्या. गेल्या ३६ वर्षात अझरूद्दीनच्या या विक्रमाच्या जवळ ५ फलंदाज पोहोचले. पण या कोणत्याही फलंदाजाला त्याचा विक्रम मोडता आला नाही. या सर्वांनी पदार्पणात सलग दोन शतक केली. या खेळाडूंमध्ये सौरव गांगुली आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्स मैदानावर पदार्पणातच आणि त्यानंतर नॉटिंघम येथे दुसऱ्या कसोटीत शतक केले होते. रोहितने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता आणि नंतर मुंबईत शतकी खेळी केली. वाचा- २०१९-२० मध्ये पाकिस्तानचा आबिद अलीकडून अझरचा विक्रम मोडला गेला असता. त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पणात नाबाद १०९ आणि नंतर दुसऱ्या कसोटीत १७४ धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. असे झाले होते अझरचे पदार्पण इंग्लंडचा संघ १९८४-८५ मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. पहिल्या मुंबई कसोटीत भारताने विजय मिळवला. पण दुसऱ्या दिल्ली कसोटीत त्याचा पराभव झाला. या पराभवाला कपिल देव यांच्या खराभ फलंदाजीला जबाबदार धरण्यात आले. यावरून बराच राडा झाला. त्यामुळे कोलकात्यात होणाऱ्या कसोटीत कपिल देव यांना वगळले. संदीप पाटील देखील संघाबाहेर होते. तेव्हाच २१ वर्षीय अझरला संधी मिळाली. त्याने सलग तीन शतक केली आणि अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला. हा विक्रम अद्याप त्याच्या नावावर आहे. अझरने ९९ कसोटीत २२ शतक झळकावली. त्याने मार्च २००० मध्ये खेळलेल्या अखेरच्या कसोटीत १०२ धावा केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pBXkJG

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...