
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या राजकीय वादाचे पडसाद सर्व ठिकाणी उमटतात. सोशल मीडियावर देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये राडा सुरू असतो. यावेळी देखील अशीच एक घटना घडली आहे. यासाठी निमित्त ठरले ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने शेअर केलेल्या एका फोटोचे... वाचा- आयसीसीने सोशल मीडियावर बलुचिस्तानमधील ग्वादर क्रिकेट ( )स्टेडियमचे दोन फोटो शेअर केले. हा फोटो शेअर करताना त्यांनी बलुचिस्तानमधील ग्वादर क्रिकेट स्टेडियममधील या फोटोचे आणखी फोटो आम्हाला पाठवा, आम्ही वाट पाहत आहोत. वाचा- ... आयसीसीच्या या पोस्टनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट चाहत्यांमध्ये राडा सुरू झाला. दोन्ही देशातील चाहत्याचे यावर कमेंट वॉर सुरू झाले. अनेक भारतीय चाहत्यांनी आयसीसीला धर्मशाला () येथील क्रिकेट स्टेडियमचे फोटो पाठवले. काहींनी तर केरळमधील केसीए स्टेडियमचे फोटो पाठवले. अर्थात ही पहिली वेळ नाही जेव्हा भारत आणि पाकिस्तान मधील चाहते सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध भिडले. काही दिवासांपूर्वी आयसीसीने एक पोल घेतला होता. त्यामध्ये कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूची कामगिरी सर्वोत्तम झाली असा प्रश्न विचारण्यात आला होता. या पोलमध्ये विराट कोहलीला मागे टाकून पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी बाजी मारली होती. पोलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग यांचा देखील समावेश होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंध तणावाचे असल्याने क्रिकेट सामने होत नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत सामने खेळतात. पण सोशळ मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून चाहत्यांमध्ये वॉर सुरूच असते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cy0pqn
No comments:
Post a Comment