
अबुधाबी: क्रिकेट मैदानावर सामना सुरू असताना अनेक गंमतीशीर घटना घडतात. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अबुधाबीत सध्या (T 10 League) सुरू आहे. या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी स्फोटक खेळी केल्याच्या बातम्या येत आहेत. पण सध्या या स्पर्धेतील असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला पोट धरून हसू येईल. वाचा- अबुधाबी आणि नॉर्दर्न वॉरिअर्स () यांच्यात झालेल्या सामन्यात वॉरिअर्सकडून खेळणारा ( ) सीमा रेषेवर फिल्डिंग करत होता. फलंदाजाने जेव्हा शॉट मारला तेव्हा तो चेंडू पकडण्याचे सोडून स्वत:चा टी शर्ट बदलत होता. रोहन मुस्तफा सामना सुरू असताना कर असलेला प्रकार पाहून चाहते देखील हैराण झाले. वाचा- रोहन सीमारेषेवर फिल्डिंगसाठी उभा होता. फलंदाजाने चेंडू मारला तेव्हा रोहन मुस्तफा टी-शर्ट बदलत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या जवळून गेला आणि त्याला तो पकडता आला नाही. यामुळे अबुधाबी संघाला चौकार मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात वासिम मोहम्मदने केलेल्या ७६ धावांच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्सने ८ विकेटनी विजय मिळवला. अबुधाबीने १० षटकात ३ बाद १२३ धावा केल्या होत्या. अनेक युझर्स या व्हिडिओवर मजेदार कमेंट देत आहेत. तर काहींनी याला अनप्रोफेशनल असे म्हटले आहे. टी-२० क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असताना आता टी-१० लीग सुरू झाले आहे. या लीगमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयसीसीने अबुधाबीत सुरू असलेल्या टी-१० लीग स्पर्धेला मान्यता दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pAq7y9
No comments:
Post a Comment