
चेन्नई: भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. जगभरातील फलंदाजांच्यात भिती निर्माण करणाऱ्या बुमराहला चेन्नईतील पहिल्या कसोटीसाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बुमराहने पहिल्या कसोटीत ज्या गोलंदाजाचा विक्रम मोडला तो खेळाडू सामन्याचा मॅच रेफरी आहे. इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी ही बुमराहच्या करिअरमधील १८वी कसोटी आहे. याआधी त्याने भारतात एकही कसोटी मॅच खेळली नाही. बुमराहच्या पदार्पणाला तीन वर्ष झालीत. पण त्याने भारतात एकही कसोटी सामना खेळला नाही. या काळात भारतात कसोटी सामने झाले. पण तेव्हा दुखपतीमुळे खेळता आले नाही. यामुळे आता बुमराहच्या नावावर एक विक्रम नोंदला गेलाय. परदेशात सर्वाधिक कसोटी खेळल्यानंतर मायदेशात कसोटी सामना खेळण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर नोंदला गेलाय. याआधी हा विक्रम माजी जलद गोलंदाज जवागल श्रीनाथच्या नावावर होता. त्याने पदार्पणानंतर १२ कसोटी सामने परदेशात खेळले होते आणि १३वी कसोटी भारतात खेळली. श्रीनाथ सध्या चेन्नईतील कसोटीत सामनाधिकारी म्हणून काम करत आहे. या यादीत आरपी सिंह ११ कसोटी, १० कसोटी आणि आशिष नेहरा १० कसोटीसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. जसप्रीत बुमराहने पाच जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर तो कसोटी संघात होता. पण जेव्हा जेव्हा भारतीय संघ मायदेशात खेळला बुमराह कोणत्या तरी कारणामुळे संघाबाहेर होता. बुमराहने १७ कसोटीत २१.५९च्या सरासरीने ७९ विकेट घेतल्या आहेत. त्याने पाच वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या असून २७ धावांवर ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ruPJND
No comments:
Post a Comment