
चेन्नई: भारत आणि इंग्लंड () यांच्यात चेन्नईत पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी संघ निवड करताना एक धक्कादायक निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सराव सत्रात अक्षर पटेलला दुखापत झाली. त्यामुळे तो सामन्यातून बाहेर झाला. सामना सुरू होण्याच्या दीड तास आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ही माहिती दिली. अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघात () आणि राहुल चाहर यांना घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले. वाचा- अक्षर पटेलला पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता होती. पण दुखापतीमुळे तो बाहेर झाला. नाणेफेकच्या वेळी कर्णधार विराट कोहलीने शाहबाज नदीम संघात असल्याचे आणि तो करिअरमधील दुसरा सामना खेळणार असल्याचे सांगितले. वाचा- भारतीय संघात ( )ला संधी मिळेल अशी चर्चा होती. पण टॉसच्या वेळी हे स्पष्ट झाले की तो संघात नाही. नदीमने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्ष त्याला संधी मिळाली नाही. पहिल्या कसोटीत नदीमने ४ विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटू अश्विन, नदीम आणि सुंदर यांना संधी दिली आहे. तर जलद गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले आहे. असा आहे भारतीय संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,शाहबाद नदीम
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YJsQJO
No comments:
Post a Comment