नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी असा काही रोमांच पाहायला मिळतो ज्याची कल्पना देखील करणे अशक्य असते. म्हणूनच हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत () स्पर्धेत अशीच घटना घडली. शेफील्ड शील्ड स्पर्धेत वेस्टर्न आणि यांच्यात चार दिवसाच्या कसोटी सामना सुरू होता. ही कसोटी अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ९ विकेट गमावल्या होत्या. अखेरच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी २३ चेंडू शिल्लक होते आणि वेस्टर्नचा ११व्या क्रमांकाचा खेलाडू फलंदाजीसाठी आला होता. लियाम ओ कॉनर क्रिझवर आला. वाचा- लियाम ओ कॉनरकडून कोणाला ही अपेक्षा नव्हती. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारला होता. पण अखेरच्या त्या २३ चेंडूत खरा ट्विस्ट झाला. लियामने विकेट गमावली नाही आणि तो अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानावर थांबला. या अखेरच्या २३ चेंडूत गैनन आणि लियाम यांनी एकही धाव घेतली नाही. कॉर्नरने ११ चेंडू खेळले आणि सामन्यातील अखेरचा चेंडू देखील खेळला. सामन्याचा अखेरचा चेंडू लियामने खेळला तो बचावात्मकरित्या खेळला होता. तरी देखील चेंडू काही वेळ हवेत होता. पण फिल्डरपासून दूर पडला. दक्षिण ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना निराशजनक ठरला. पण या सामन्यात शानदार क्रिकेट पाहता आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावा विजयासाठी ३३२ धावा करायच्या होत्या. त्यांनी १४३ वर ९ विकेट गमावल्या होत्या. अखेर कॉर्नरने सामना ड्रॉ करून दाखवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MxPVN2