
ख्राइस्टचर्च: न्यूझीलंड आणि बांगलादेश () यांच्यातील तिसरा टी-२० सामना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसामुळे हा सामना प्रत्येकी १० षटकांचा करण्यात आला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फिन एलनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने १० षटाकत ४ बाद १४१ धावा केल्या. वाचा- विजयासाठी विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सर्वबाद ७६ धावा करता आल्या. न्यूझीलंडने सामना ६५ धावांनी तर मालिका ३-०ने जिंकली. या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. न्यूझीलंडचा विकेटकिपर ()ने अशी काही विकेटकिपिंग केली की बांगालदेशचा फलंदाज अफिफ हुसैन अवाक झाला. वाचा- भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी विकेटच्या मागे चालाखीने फलंदाजाला बाद करायचा. अशीच चालाखी कॉनवेने हुसैनला बाद करताना दाखवली. त्यामुळे हुसैनला बाद झाल्यानंतर देखील विश्वास बसत नव्हता की तो बाद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा- बांगलादेशच्या डावात आठव्या षटकात कॉनवेने हुसैनला टॉड एस्टरच्या गोलंदाजीवर बाद केले. हुसैनने एस्टरच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मीस झाला. चेंडू विकेटकिपर कॉनवेकडे गेला. त्याने चेंडू पटकन विकेटला लावण्याआधी काही वेळ वाट पाहिली आणि जेव्हा फलंदाजाने पाय हवेत उचलला तेव्हा पटकन चेंडू विकेटला लावला. वाचा- वाचा- तिसऱ्या अंपायरने रिप्लेमध्ये पाहिले की हुसैनचा पाय क्रिझच्या बाहेर आहे. अंपायरने बाद दिल्यानंतर हुसैन देखील विचारात पडला की तो कसा काय बाद झाला. आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dF0WWD
No comments:
Post a Comment