
मुंबई: गेल्या काही दिवसात देशात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आयपीएल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली असताना वानखेडे मैदानावरील ८ ते १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या शिवाय दोन खेळाडू आणि अन्य सहा जणांना करोना झाला आहे. आयपीएलशी संबंधित जवळपास १९ जणांना करोना झाल्याने बीसीसीआयची काळजी वाढली आहे. पण त्यांनी आशा सोडली नाही. मुंबईतील वानखेडे मैदानावरील १० कर्मचाऱ्यांना करोना झाल्याने आता टेन्शन वाढले आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामात या मैदानावर १० ते २५ एप्रिल या कालावधीत सामने होणार आहेत. जर करोना व्हायरसची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर इंदूर किंवा हैदराबाद येथील मैदानांचा स्टॅड बाय म्हणून ठेवण्यात आले आहे. वानखेडेवर आयपीएलमधील १० लढती होणार आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ४७ हजार करोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात लॉकडाउनची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांवर देखील संकटाचे ढग जमा झाले आहेत. वानखेडे मैदानावरील १० ग्राउंड स्टाफना करोनाची लागण झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधी ८ जणांना करोनाची लागण झाली होती. आता त्यात दोनने वाढ झाली आहे. या सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे. मैदानाच्या तयारीसाठी कांदिवली येथून असोसिएशनच्या अन्य कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31HEvds
No comments:
Post a Comment