
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि महान फलंदाज व्हायरसची लागण झाली. सुरुवातीला घरी उपचार घेतल्यानंतर सचिन काल (२ एप्रिल) रुग्णालयात दाखल झाला. मास्टर ब्लास्टर सचिनच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. त्याची प्रकृती कशी आहे याचे अपडेट मिळवण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत. वाचा- सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत सचिनने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद देखील मिळवले. रायपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेनंतर मुंबईत आल्यावर सचिनला करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली. करोना टेस्ट केल्यावर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोना झाल्याची माहिती सचिनने सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर सचिन रुग्णालयात दाखल झाला. वाचा- सचिनच्या प्रकृती संदर्भात सर्वजण काळजीत आहेत. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर एका आठवड्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील सचिनने शुभेच्छा आणि प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले होते. सचिनची प्रकृती कशी आहे याचे अपडेट शनिवारी संध्याकाळी त्याच्या जवळच्या मित्राने दिली. वाचा- अतुल रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनच्या प्रकृती संदर्भात काळजी करण्याचे काही कारण नाही. खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना रानडे म्हणाले, सचिन रुग्णालयात यासाठी दाखल झाला कारण तेथे योग्यरित्या देखरेख होईल. त्याला करोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे गरजेचे होते. वाचा- मुंबईतील गोरेगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात सचिनला दाखल करण्यात आले आहे. याच रुग्णालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मंगळवारी दाखल करण्यात आले होते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3morqzp
No comments:
Post a Comment