
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन मालिकेत दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने प्रथम ऑस्ट्रेलियात आणि नंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध मोठे विजय मिळवले. या दोन्ही मालिकेत अनेक स्टार खेळाडू संघात नसताना भारतीय खेळाडूंनी विजय मिळवले. भारतीय संघाच्या या कामगिरीवर बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी कौतुक केले. वाचा- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने संघाचे कौतुक केले आहे. सर्वजण शानदार खेळले पण एका खेळाडूने मला सर्वाधिक प्रभावित केले. भारतीय संघातील विकेटकिपर ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात शानदार कमबॅक करत विजय मिळवून दिला. वाचा- पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत तुफानी फलंदाजी केली आणि सामन्याची दिशाच बदलली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील या खेळाडूने सर्वांचे मन जिंकले. वाचा- भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. बीसीसीआय अध्यक्ष होण्याच्या नात्याने मी एका खेळाडूला दुसऱ्यापेक्षा वर ठेवू शकत नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीचा मी आनंद घेतो. पण पंतने खऱ्या मला वेड केले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली कामगिरी केल्याचे गांगुलीने म्हटले. वाचा- पंतने इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटीत एका शतकासह २७० धावा केल्या. टी-२०मध्ये त्याने १०२ तर दोन वनडेत १५५ धावा केल्या. यात ७८ ही सर्वोच्च खेळी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटीत त्याने २७४ धावा केल्या. ९७ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rVFSQN
No comments:
Post a Comment