
चेन्नई : मुंबई इंडियन्सने यावेळी झालेल्या लिलावात तब्बल सहा पट जास्त किंमत मोजत एका खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल केले होते. हा खेळाडू आज मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. या खेळाडूचा फोटो मुंबई इंडियन्सने ट्विट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सने लिलावात अॅडम मिल्ने या वेगवान गोलंदाजाला तब्बल सहा पट जास्त किंमत मोजत आपल्या संघात दाखल करुन घेतले.मिल्नेची बेस प्राइज यावेळी ५० लाख एवढी होती. यावेळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये त्याला संघात घेण्यासाठी चांगली चुरस लागली होती. त्यानतर सनरायझर्स हैदराबादचा संघही त्याला घेण्यासाठी उत्सुक होता. त्यावेळी तब्बल ३ कोटी आणि २० लाख एवढी किंमत मोजत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. आज न्यूझीलंडच्या खेळाडूंसह मिल्नेदेखील मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला यावेळी वेगवान गोलंदाजाची गरज भासणार आहे. कारण लसिथ मलिंगानंतर त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीचा चांगला पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मलिंगाची जागा भरण्यासाठी मिल्नेना यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या संघात दाखल करुन घेतले. आता ट्रेंट बोल्ड आणि जसप्रीत बुमरा यांच्याबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघात गोलंदाजी करताना आता मिल्ने दिसणार आहे. मुंबईच्या संघाने आतापर्यंत विक्रमी पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे, त्यामुळे या हंगामात त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sK4c9e
No comments:
Post a Comment