
कोलकाता : भारताच्या क्रिकेटपटूंबाबत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आता एक मोठा खुलासा केला आहे. भारताच्या खेळाडूंना परदेशातही खेळायचे आहे, पण त्यांना खेळायला मिळत नसल्याचे मॉर्गनने यावेळी सांगितले आहे. भारताच्या खेळाडूंना परेदशात कुठेही खेळायचे असेल तर त्यांना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. जर बीसीसीआयची परवानगी नसेल तर त्यांना परदेशात कुठेही खेळता येत नाही. त्याचबरोबर जर खेळाडूने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय जर परदेशात खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतामध्ये क्रिकेट खेळता येत नाही. त्यामुळेच भारताचे जास्त खेळाडू परदेशातील लीगमध्येही खेळताना दिसत नाहीत. भारतीय खेळाडूंना परदेशात जास्त मागणी आहे. त्याचबरोबर त्यांचे चाहतेही परदेशीत जास्त आहेत. पण भारतीय खेळाडू नावाजलेल्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळताना दिसत नाहीत. या गोष्टीकडे मॉर्गनने सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. मॉर्गनने यावेळी सांगितले की, " भारतीय खेळाडूंना परदेशातील लीगमध्येही खेळायचे आहे. इंग्लंडमध्येही 'द हंड्रेड' लीग होते आणि या लीगमध्येही भारतीय खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे. कारण भारतीय क्रिकेटपटूंना प्रवास करायाल आवडतो. त्याचबरोबर नवीन परिस्थिती आणि संस्कृतीशी जुळवून घ्यायला त्यांना आवडते. त्यामुळे त्यांना परदेशातील लीगही खेळायच्या आहेत. जर भारतीय खेळाडू परदेशात खेळायला लागले तर त्यांचा या लीगलाही चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तरी भारतीय क्रिकेटपटूंनी जगभरातील लीगमध्ये खेळावे, असे मला वाटते." मॉर्गनच्या या वक्तव्यानंतर या गोष्टींमध्ये कोणता फर पडणार का, याची उत्सुकता परेदशातील चाहत्यांना नक्कीच असेल. आतापर्यंत काही देशांतील खेळाडू परेदशातील लीगमध्ये खेळताना दिसत नाहीत. त्यामुळे आयसीसीने याबाबत ठोस पाऊले उचलावीत, असेदेखील मॉर्गनने यावेळी म्हटले आहे. यावेळी मॉर्गन म्हणाला की, " ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा प्रकार वेगाने वाढत आहे आणि चांगलाच लोकप्रियही झाला आहे. पण ट्वेन्टी-२० क्रिकेट जेवढ्या वेनगाने वाढले तेवढा बदल मात्र त्याच्यामध्ये झालेला पाहायला मिळत नाही. यासाठी आयसीसीनेही या गोष्टींमध्ये दखल घालायला हवी. कारण जेवढे नावाजलेले खेळाडू या लीगमध्ये खेळतील तेवढा क्रिकेटलाही चांगलाच फायदा होणार आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39BZsLq
No comments:
Post a Comment