
मुंबई: आजच्या दिवशी भारतीय संघाने २०११ मध्ये आयसीसी वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाचा आनंद साजरा करणाऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सचिनला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. वाचा- रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन तेंडुलकरने भारताचे नेतृत्व करत विजेतेपद मिळवून दिले होते. सहा दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर करोनाची लागण झाल्याचे सांगितले. आज डॉक्टरांच्या सल्ल्याने तो रुग्णालयात दाखल झाला आहे. सचिनच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्व जगातील चाहते प्रार्थना करत आहेत. वाचा- ... सचिन रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच भारतातील क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याला गेट वेल सुनच्या शुभेच्छा दिल्या. अशाच शुभेच्छा पाकिस्तानमधून देखील आल्या आहेत. पाकचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरमने सचिनला त्याच्या पदार्पणाची आठवण करून दिली. ज्या पद्धतीने तु १६व्या वर्षी दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली होतीस. त्याच पद्धतीने करोनाला देखील सीमारेषेच्या बाहेर पाठव आणि लवकर बरा हो. वाचा- अकरम म्हणतो, तु जेव्हा १६ वर्षाचा होतास तेव्हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मोठ्या हिम्मतीने आणि धैऱ्याने सामना केला होतास. मला विश्वास आहे की करोनाला देखील तु षटकार मारशील. लवकर बरा हो मास्टर! याच बरोबर अकरमने त्याला वर्ल्डकप जिंकल्याच्या १० वर्षाचा आनंद डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत साजरा केलास तर छान होईल आणि त्याचा मला एक फोटो पाठवशील. वाचा- वाचा- सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. तेव्हा त्याचे वय फक्त १६ वर्ष आणि २०५ दिवस होते. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने दोन चौकारांसह १५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात सचिनने वकाल युनुस, अब्दुल कादिर आणि वसीम अकरम सारख्या घातक गोलंदाजांचा सामना केला होता. या पदार्पणाच्या सामन्यात सचिनने त्याच्या फलंदाजीने सर्वांना हैराण केले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QSvpIM
No comments:
Post a Comment