
चेन्नई : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्ससाठी एक आनंदाची बातमी आता आली आहे. कारण केकेआरच्या एका महत्वाच्या खेळाडूला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. केकेआरच्या संघातील भारताचा एक खेळाडू काही दिवसांपूर्वी करोना पॉझिटीव्ह ठरला होता. त्यामुळे त्याला यापुढे क्रिकेट खेळता येणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्ती केली जात होती. पण आता या खेळाडूचा करोना चाचणीचा दुसरा रिपोर्ट आला आहे. यानंतर केकेआरच्या संघाने केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. आयपीएलमधून कोलकाता नाइट रायडर्सकडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून नितीश राणा हा खेळत आहे. २२ मार्चला राणाचा करोनाचा पहिला रीपोर्ट आला होता. या रिपोर्टमध्ये राणा करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले होते. त्यामुळे राणाला क्वारंटाइन करण्यात आले होते आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. आता राणाचा दुसरा रीपोर्ट आल्याचे समजते आहे. केकेआरने याबाबतचा खुलासा केला आहे. केकेआरने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये केकेआरच्या संघाने म्हटले आहे की, " आयपीएलसाठी संघामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राणाचा करोना अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या नियमांनुसार राणाची करोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी राणा करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले होते. त्यामुळे राणाला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राणाची करोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी राणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राणा केकेआरसाठी खेळणार असून येत्या काही दिवसांमध्येच तो सरावही करणार आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39z6vUW
No comments:
Post a Comment