
चेन्नई : भारताचे नावाजलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळल्याचे आज पाहायला मिळाले. कारण महिंद्रा यांनी जे सांगितले होते ते आज करुन दाखवले. कारण आता टी. नटराजनला आज एक खास भेटवस्तु मिळाली असून त्याने आपला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयाने महिंद्रा भारावुन गेले होते. त्यानंतर महिंद्रा यांनी या विजयानंतर भारतीय संघातील मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना आपल्या कंपनीची खास गाडी भेट देणार असल्याचा शब्द त्यांनी दिला होता. आज नटराजनच्या घरी महिंद्रा यांनी पाठवलेली गाडी आल्याचे पाहायला मिळाले. नटराजने या खास गाडीबरोबर आपले फोटो काढले असून त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये नटराजने म्हटले आहे की, " भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. या मार्गावरील माझा प्रवास आता अधिक चांगला होणार आहे. आत्तापर्यंतच्या या प्रवासात मला जे प्रेम मिळालं, लोकांनी ज्यापद्धतीने वागणूक दिली ते पाहून मी सुखावलो आहे. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच मला यापुढेही मार्गक्रमण करण्यास मदत होणार आहे." नटराजन पुढे म्हणाला की, " मी आज महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची थार ही गाडी चालवून आलो आहे. मी आनंद महिंद्रा यांचे आभार यावेळी मानतो की, ज्यांनी माझा प्रवास ओळखला आणि मला पाठिंबा दिला. क्रिकेटसाठी तुमचे असलेले प्रेम खरंच खुप मोठे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जो भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा परीधान केलेली जर्सी मी आपल्याला सही करून देत आहे." नटराजनची सुरुवातची परिस्थिती फार बिकट होती. नटराजन हा एका झोपडीमध्ये राहत होता. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्याची परिस्थिती सुधारली. पण आज आंनद महिंद्रा यांनीही नटराजनच्या कामगिरीचा गौरव केला आहे. त्याचबरोबर आपला शब्द पाळत त्यांनी नटराजनला आपल्या कंपनीची हाडी भेट स्वरुपात दिलेली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fv7B8c
No comments:
Post a Comment