
चेन्नई : मुंबई इंडियन्सचा संघ यावर्षी जेतेपद पटकावून हॅट्रीक पूर्ण करणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आता सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा खास वर्ग आज भरवण्यात आला होता. यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला काही टिप्सही सांगण्यात आल्या. मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग दोन वर्षे आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवेळा जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वी आज खास मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची खास शाळा भरवण्यात आली होती. आयपीएल जिंकण्यासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. पण या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये करोनाची दुसरी लाट आल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे करोनाबाबत मुंबई इंडियन्सच्या संघाची जागृती करण्यासाठी आज एक वर्ग भरवण्यात आला होता. आयपीएलमधील सर्वच खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहायचे आहे. हे बायो-बबल नेमकं कसं असेल आणि त्याचे नियम काय असतील, याबाबत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना आज सर्व माहिती देण्यात आली. बायो-बबलमध्ये असताना करोनाची लागण होत नाही, असे म्हटले जाते. पण हे बायो-बबल सोडून खेळाडूंना कुठेही जाता येत नाही. खेळाडूंना एकत्रितपणे सराव करण्यापासून ते हॉटेलमध्ये राहण्यापर्यंत सर्व काही नियमांनुसार करावे लागते. जर एखादा खेळाडू संघाला सोडून बाहेर गेला, तर त्याला पुन्हा एकदा करोना चाचणी करावी लागते आणि त्याला पुन्हा क्वारंटाइन व्हावे लागते. त्यामुळे बायो-बबलच्या नियमांचे काटेकोर पालन यावेळी सर्व खेळाडूंना करावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएलचे जेतेपद पटकावायचे असेल आणि सर्व खेळाडू संघात हवे असतील तर त्यासाठी बायो-बबलचे नियम जाणून घेणे, ही पहिली पायरी असल्याच समजले जाते. त्यामुळे आज मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना खास बायो-बबलबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mglckV
No comments:
Post a Comment