
अँटिगा: कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि यांच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेला चौथ्या दिवशी विजयासाठी ३७७ धावांचे अवघड लक्ष्य दिले आहे. पहिल्या डावात १२६ धावा करणाऱ्या ब्रेथवेटने दुसऱ्या डावात ८५ धावा केल्या. त्याचे शतक १५ धावांनी हुकले. वाचा- ... वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात काइल मायर्नने ५५ तर होल्डरने नाबाद ७१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने दुसरा डावा चार बाद २८० धावांवर घोषित केला. श्रीलंकेने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ३५४ धावांच्या बदल्यात २५८ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा श्रीलंकेने विकेट न गमावता २९ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी ३४८ धावांची गरज आहे. वाचा- या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चे आला आहे. ज्यात वेस्ट इंडिजचा एक खेळाडू श्रीलंकेच्या फलंदाजाला म्हणतो की, गेल्या वेळी तु जेव्हा इथे खेळायला आला होतास तेव्हा तुझा हात मोडला होता. आठवतय का? आता हे वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की वेस्ट इंडिजच्या खेळाडूने लंकेच्या खेळाडूला धमकी दिली की काय. वाचा- कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार होल्डरने लंकेच्या खेळाडूशी गंमत केली आणि स्लेजिंग देखील केले. या घटनेचा व्हिडिओ वेस्ट इंडिज बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो गोलंदाजाला म्हणतो, शेनन तु त्याला स्टंवर चेंडू का टाकत आहेस. तो आधी पासून बॅकफुटवर फलंदाजी करत आहे. वाचा- एवढ बोलून झाल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर येथे उभा असलेल्या धनजंय डिसिल्वाकडे पाहतो आणि म्हणतो, धनजंय तु जेव्हा याआधी येथे आला होतास तेव्हा तुझा हात मोडला होता. आठवतय ना? वाचा- होल्डरचे हे वाक्य ऐकल्यानंतर धनजंय देखील हसू लागला. त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oe9r1U
No comments:
Post a Comment